कोकणात वेगवाग घडामोडी! भरत गोगावलेंचा नगरपरिषद निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव, महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bharat Gogawale : स्थानिक निवडणुकीतील पहिला टप्पा नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय मैदान तापायला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी महायुतीमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याचे दिसत आहे. निवडणुकीसाठी बैठकांचा सैलसिला सुरू असून, मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महाराष्ट्रासह कोकणातील राजकीय मैदान तापायला सुरुवात झाली आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले यांनी एक नवीन फॅार्म्युला आखत तसा प्रस्ताव ठेवला आहे. या अगोदर गोगावले यांनी जिल्हा परिषदेसाठी प्रस्ताव सुनील तटकरे यांना दिला होता. मात्र, तटकरे यांनी प्रस्तावावर सहमती दर्शवली नाही, अशी चर्चा आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भरत गोगावले यांनी ज्या नगर पालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्याला जास्त जागा द्यायच्या असा प्रस्ताव ठेवला आहे. पण या प्रस्तावाला महायुतीमधील घटक पक्ष कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

अंतिम निर्णयाकडे लक्ष

या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसेतसे कोकणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कणकवली नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात स्थानिक नेत्यांची महत्वाची बैठक देखील नुकतीच झाली आहे. यामुळे जर दोन्ही शिवसेना एकत्र निवडणुकीला सामोरी गेली तर एक वेगळं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळेल. तूर्त याबद्दल अंतिम निर्णय होणे बाकी आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

नारायण राणेंचा इशारा 

कणकवली नगरपालिकेत शिंदे-ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. राजन तेली यांनीही याबाबत दुजोरा दिल्याची माहिती आहे. आता याविषयी भाजपचे नेते मंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. याविषयी नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरीत शिवसेनेशी युती तोडण्याचा इशाराच दिला आहे. यामुळे आगामी काळात येथील स्थानिक निवडणुकीत मोठे राजकीय घमासान पाहायला मिळणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे.

हेही वाचा : Pimpri : उमेदवारी कोणाच्या हाती ? इच्छुकांची धाकधूक वाढली

The post कोकणात वेगवाग घडामोडी! भरत गोगावलेंचा नगरपरिषद निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव, महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!