Pimpri : उमेदवारी कोणाच्या हाती ? इच्छुकांची धाकधूक वाढली

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी – संघटनात्मक दृष्टीने भाजप सध्या शहरातील सर्वांत प्रबळ पक्ष मानला जातो. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व जागांवर निवडणूक लढल्यास पक्षातील बहुतेक इच्छुकांना संधी देता येईल.

राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून स्वबळावर निवडणूक लढण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. तर दसरीकडे अचानकच या घटनाक्रमात चंद्रकांत पाटील यांची इंट्री झाली असून त्यांच्या वक्तव्याने स्वबळावर लढण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच निवडणुकीची जबाबदारी सोपविताना चिंचवडला मिळालेल्या झुकत्या मापामुळे उमेदवारी वाटप नेमके कोणाच्या हातात आहे? असा प्रश्न इच्छुकांना पडला असून अनेकांची धाकधूक वाढली आहे.

२०१७ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. विविध कारणांनी लांबणीवर पडलेल्या या निवडणुकीची तयारी करण्यात इच्छुकांनी सुमारे चार वर्षे घालवली आहेत. या तयारीत मोठ्या प्रमाणात अर्थ, ऊर्जा आणि बड्या नेत्यांसोबत जवळीक साधण्याचे कौशल्य खर्ची घातले आहे. आता अचानकच सूत्रे फिरताना दिसत असून पुण्यातील नेत्यांची पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर इंट्री झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची

उमेदवारीचे निकष काय?

मागील निवडणुकीत उमेदवारी वाटप आणि त्यानंतर महापालिकेत पद वाटप प्रक्रियेत चिंचवड आणि भोसरीचे आमदार आपपल्या समर्थकांना संधी देत होते. परंतु यंदा चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना शहर निवडणूक प्रमुख पदाची जबादारी सोपविली आहे.

तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मावळची जबाबदारी देत शहराच्या राजकारणातूनच दूर करण्याची खेळी केली आहे का? अशा चर्चांना वेग आला आहे. तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील निवडणुका संपल्यानंतर लांडगे पुन्हा शहरात सक्रिय होतील, असा एक सूर आळवला जात आहे. परंतु या घटनाक्रमामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक पदासाठी इच्छुक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

सूत्रे सोपविण्यात आली आहे. तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या विधानसभा निहाय बैठका घेत आहेत. यामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

कशी बदलली परिस्थिती ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्ताकारण २०१७ पूर्वीपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती होते. पिंपरी चिंचवड हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे चिंचवडचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपचे तब्बल ७७ नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात नेले. भाजपाला पहिला महापौर या शहराला स्व. लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली मिळाला.

तेव्हापासून शहराचे महापालिकेचे सत्ताकारण चिंचवड आणि भोसरी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागले गेले. जगताप आणि लांडगे पक्ष पातळीवर आपपल्या परिसरात निर्णय घेत आले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना यांच्याकडूनच अपेक्षा आहेत. दरम्यान विद्यमान आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप या दोघांनाही भाजपचे शहर अध्यक्षपद भूषविले आहे. परंतु आता शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शत्रुघ्न काटे यांच्याकडे आहे. पूर्वी केवळ दोनच सत्ताकेंद्रे होती. आता शहरात

अंतर्गत नाराजी

काही दिवसांपूर्वी भाजपने जम्बो कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यात अनेकांना डावलण्यात आल्याचे आरोप झाले होते. अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मुद्दाम डावलले असल्याचा आरोप केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली होती.

आता पुन्हा पक्षात नाराजीचे सूर उमटण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः भोसरी मतदारसंघात आमदार लांडगे यांच्या समर्थक इच्छुकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यानुसार काही जागांवर युती आणि काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर त्याचा सर्वाधिक फटका भोसरी मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. कारण भोसरी मतदारासंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे.
दोन विधानसभा आणि दोन विधाना परिषद असे भाजपचे चार आमदारा झाले आहेत. पूर्वी आमदारांपैकी कुणी एक शहर अध्यक्ष असे आता शहराध्यक्षही वेगळे आहेत. त्यात आता पुण्यातून मंत्री स्तरावरीला वरिष्ठ नेत्यांनी देखील शहरात लक्षा घालण्यास सुरुवात केली आहे.

The post Pimpri : उमेदवारी कोणाच्या हाती ? इच्छुकांची धाकधूक वाढली appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!