
महाबळेश्वर : ‘क’ वर्गातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून महाबळेश्वरचे नाव असल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी असून उमेदवार निवडीची प्रक्रिया करम्यामध्ये नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे. उमेदवारांच्या निवडीनंतर येथे होणाऱ्या लढती प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.
महाबळेश्वर नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे समस्त महाबळेश्वरकरांचे लक्ष लागले आहे. साडेचार वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय काराभार अनुभवल्यानंतर इच्छुक उमेदवारांबरोबरच महाबळेश्वरवासीय हक्काच्या नगराध्यक्ष नगरसेवक कधी मिळेल या प्रतीक्षेत होते.आता निवडणूक प्रक्रियेसाठी फक्त एक महिन्याचा कालावधी मिळाल्याने सर्वपक्षीय नेतेमंडळींची कार्यकर्त्यांची व इतर इच्छुकांची पुरती धांदल उडाली आहे. नगरपालिकेवर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी सर्वपक्षीयांनी जोर लावला असून याबाबत बैठकीचे सत्र सुरु झाले आहे.
प्रस्थापितांबरोबरच नव्याने इच्छुक उमेदवारांची रांग सर्व पक्षातील स्थानिक प्रमुखांकडे लागली आहे. परंतु, पुढील राजकीय गणिते काय असतील, कुठल्या प्रभागात कोणाचे वर्चस्व असेल याचा आपल्या पक्षाला, आघाडीला कसा फायदा होईल, याची गणिते सध्या सुरु आहेत. काही मोजके उमेदवार वगळता कोणताही पक्ष किंवा राजकीय आघाडी आपले उमेदवार गुलदस्त्यातून बाहेर काढायला तयार नाहीत. यामुळे इच्छुक उमेदवार पक्षाकडून मिळणाऱ्या तिकिटांबाबत चिंतेत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यातून बऱ्याच पक्षांमध्ये नाराजीचे सत्र देखील पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शिवसेनेची धुरा माजी नगरसेवक कुमार शिंदे, शहरप्रमुख विजय नायडू, हेमंत साळवी यांनी हाती घेतली असून शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी कुमार शिंदे यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. याचबरोबर इतरत्र प्रस्थापितांची चढाओढ सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळींना मदत व पुनर्वसन मंत्री व स्थानिक आमदार मकरंद पाटील, राजूशेठ राजपुरे यांची साथ मिळत असली तरी देखील स्थानिक नेत्यांकडून नगराध्यक्षपदाबरोबर नगरसेवकपदासाठी प्रस्थापितांबरोबरच इच्छुक उमेदवारांचे प्रभागातील गणित बसवणे अवघड जात आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी कमी काळ राहिला असून देखील कोणतीच मोर्चेबांधणी होत नसल्याने चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे. मंत्री मकरंद पाटील पक्षातील अंतर्गत समस्या मिटवून नगराध्यक्षपदासाठी कोणता उमेदवार अंतिम करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीकडेही लक्ष
शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर तसेच माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, सुनील नाना साळुंखे, सचिन वाघदरे यांच्या भूमिकेवर देखील बरीच राजकीय गणिते अवलंबून असून त्यांच्यामार्फत नगराध्यक्षपदा साठी कोणता उमेदवार जाहीर होईल, याचबरोबर निवडणुका महाविकास आघाडीमधून लढणार की स्वबळावर लढणार का इतर स्थानिक आघाड्यांबरोबर युती करणार हा सध्या चर्चेचा विषय आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार आहे, ते किती जागांसाठी आग्रही असणार आहेत याकडे सर्वांच लक्ष आहे.
The post Satara : महाबळेश्वरमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











