Baramati News : राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण? अजितदादा आज बारामतीत, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामतीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण आहे. त्यामुळे या पदावर संधी मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.

त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र युवा नेते जय पवार यांचेही नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. बारामतीच्या नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश निश्चित केला जाईल अशी चर्चा होत आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींची शक्यता आहे. त्यातच दुसरीकडे दि. १० नोव्हेंबरपासून नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

त्यानंतर अवघे काहीच दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासह अन्य उमेदवारांबाबत उद्या चाचपणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बारामती नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. नगराध्यक्षपदाबरोबरच नगरसेवकपदाची संधीमिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला अजितदादांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

यांची नावे चर्चेत..
बारामतीत राष्ट्रवादीकडून किरण गुजर, सचिन सातव, जय पाटील, शिवाजीराव कदम ,सुभाष सोमाणी, जयसिंग देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. करण वाघोलीकर, शाम इंगळे, प्रदीप शिंदे ,अनिल कदम, विशाल जाधव विक्रांत तांबे यांनी देखील पक्षाकडे मागणी केली आहे.

चौओबीसी चेहऱ्याला संधी ?
बारामती नगर नगरपरिषदेसाठी खुल्या प्रवर्गातील आहे. असे असले तरी नगराध्यक्षपदी ओबीसी चेहऱ्याला संधी मिळावी ही मागणी देखील जोर धरू लागले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खुल्या प्रवर्गातून ओबीसी चेहऱ्याला संधी देणार का याकडे देखील लक्ष लागले आहे.

The post Baramati News : राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण? अजितदादा आज बारामतीत, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!