Pimpri Crime : काळेवाडीत संपत्तीच्या वादातून वाहने जाळली; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, दोघे अटकेत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – संपत्ती नावावर करुन देण्याच्‍या वादातून दोन तरुणांनी एका महिलेची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली आणि महिला व तिच्या पतीस मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अष्ट.िविनायक काॅलनी, ज्‍योतिबानगर, काळेवाडी येथे घडली.या संदर्भात एका ५५ वर्षीय महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन श्रीमंत हंगरगे (वय ३५) आणि अमोल श्रीमंत हंगरगे (वय ३०, दोघेही रा. अष्टविनायक काॅलनी, ज्‍योतिबानगर, काळेवाडी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. आरोपींनी इस्‍टेट नावावर करुन देण्याच्‍या कारणावरुन वाद करत मोटार आणि दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावून दिली. तसेच वाहनांवर आणि घरावर दगड फेकून काचा फोडल्‍या. फिर्यादी महिला व तिच्‍या पतीस मारहाण केली. तसेच फिर्यादी महिला व तिचा मुलगा कृष्णा यास राॅकेल टाकून पेटवून देण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

The post Pimpri Crime : काळेवाडीत संपत्तीच्या वादातून वाहने जाळली; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, दोघे अटकेत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!