Pune Crime : बिल्डरला मदत करणे महागात; ८० वर्षीय नागरिकाच्या घर पाडकाम प्रकरणी आतापर्यंत दोन पोलीस निलंबित

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गुलटेकडीतील टीएमव्ही कॉलनीत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून अनावश्यक हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला थेट सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित कर्मचार्‍याची नियुक्ती मुख्यालयात आहे. मात्र, स्वारगेट येथील पाडकाम प्रकरणात त्याची उपस्थिती अन् हस्तक्षेप आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

समीर जगन्नाथ थोरात (नेमणूक – पोलीस मुख्यालय) असे निलंबित पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. मुकुंदनगरलगतच्या गुलटेकडी परिसरातील टीएमव्ही कॉलनीत तक्रारदार ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दोन मजली बंगला आहे. या जागेबाबत बिल्डर देवेश जैन यांच्याशी व्यवहार झाला होता. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच बिल्डरने जबरदस्तीने घराबाहेरील भिंतीचे पाडकाम केले. याप्रकरणी बिल्डर जैन यांच्यासह चौघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आता याच प्रकरणात मुख्यालयातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याला निलंबित करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी थोरात घटनास्थळी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. थोरात यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असतानाही ते स्वारगेट परिसरात सुरू असलेल्या पाडकामावेळी तिथे हजर होते. या प्रकरणात त्यांचा अनावश्यक हस्तक्षेप आढळून आला आहे. याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यालयाच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

यापूर्वी एका कर्मचार्‍याचे निलंबन..
या प्रकरणात यापूर्वी स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. विजय नामदेव शिंदे असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे. बंगल्यावरील बेकायदा पाडकामाच्या घटनेत बंदोबस्तासाठी नेमलेले असतानाही शिंदे हे त्याठिकाणी गैरहजर आढळले. त्यांच्या अनुपस्थितीत जेसीबीद्वारे कंपाऊंड व लोखंडी गेट तोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी निलंबनाचे आदेश दिले.

The post Pune Crime : बिल्डरला मदत करणे महागात; ८० वर्षीय नागरिकाच्या घर पाडकाम प्रकरणी आतापर्यंत दोन पोलीस निलंबित appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!