‘ऍडमिशन रॅकेट’चा पर्दाफाश; नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाला ४७ लाखांचा गंडा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने नवी मुंबईतील एका व्यावसायिकाची ४७ लाख रुपयांची फसवणूक केली असून आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी राजगोपाल वैष्णव पाणीग्रही (रा. नेरुळ,नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार, आरोपी शिवम शर्मा उर्फ गोपी, करण लोणकर, विपीन सिंग, प्रियांका कुमारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी वडगाव शेरीत युवर नेक्स स्टेप हे कार्यालय सुरू केले होते. नामांकित शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. तक्रारदाराच्या मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने आरोपींनी वेळोवेळी ४७ लाख रुपये घेतले. प्रवेश न मिळाल्याने त्यांनी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

The post ‘ऍडमिशन रॅकेट’चा पर्दाफाश; नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाला ४७ लाखांचा गंडा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!