
प्रभात वृत्तसेवा
जेजुरी – राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.८)शिवाजीनगर पुणे येथील कार्यालयात इच्छुक उमेदवार व तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष, यांच्याशी संपर्क साधला.यावेळी जेजुरी नगरपालिका निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसांमध्ये पक्ष निरीक्षकांनी व तालुकाध्यक्ष यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात,तसेच सर्व्हे करावा त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, माजी आमदार संभाजी कुंजीर, माजी राजपत्रित अधिकारी ज्येष्ठ नेते संभाजी झेंडे,सुरेशआण्णा घुले,पुरंदर तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ आदींसह सासवड,जेजुरी, फुरसुंगी,येथील आजी माजी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह आमदार विजय शिवतारे यांच्या शिवसेना पक्षाबरोबर आघाडी करावी, अशी धारणा जेजुरीतील तिन्ही पक्षीय कार्यकर्त्यांची आहे.
यामध्ये जेजुरीतील दोन्ही राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवारांनी आपली भूमिका पवार यांच्यापुढे मांडली. यामध्ये प्रामुख्याने जयदीप बारभाई, गणेश निकुडे,रोहिदास कुंभार,तानाजी जगताप,अमृता घोणे,मंगेश घोणे, दिगंबर उबाळे आदींसह माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची यादी जेजुरी शहराध्यक्ष रमेश लेंडे यांनी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली.
संदीप जगताप यांनी मांडली ठोस भूमिका..
गेली १७वर्षांपासून संभाजी ब्रिगेड आणि किसान क्रांती मोर्चातून सामाजिक चळवळीत कार्यरत असून मार्तंड देवसंस्थान न्यासावर विश्वस्तपदी कार्यरत असताना अनेक विकास कामे केली असून नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास निश्चित विजय प्राप्त होईल. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसाधारण प्रवर्गाला या पदावर काम करण्याची संधी मिळाली नसल्याने प्राधान्याने विचार व्हावा अशी ठाम भूमिका संदीप जगताप यांनी मांडली.
The post Ajit Pawa : जेजुरीचा नगराध्यक्ष कोण? अजित पवारांनी घेतला इच्छुकांचा ‘क्लास’, उमेदवार ठरवण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











