Satara Politics : वाईच्या राजकारणात ट्विस्ट! आरक्षणामुळे दिग्गजांचा पत्ता कट, आता पत्नीसाठी जोरदार लॉबिंग

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
सातारा ( मयूर सोनावणे ) – वाई तालुक्यातील भुईंज, पाचवड गणात सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या आकांक्षांवर पाणी फिरले आहे. मात्र, तरीही धीर न सोडता या इच्छुक ‘श्रीं’नी आपल्या ‘सौं’साठी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे साकडे घातले आहे.भुईंज व पाचवड गणात सध्या मंत्री मकरंद पाटील यांचेच वर्चस्व आहे. या दोन्ही गणांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती.

मात्र, आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचा कार्यक्रम झाला आहे. मात्र, तरीही न खचता, न माघारी फिरता या दिग्गजांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. इच्छुकांची वाढत असलेली संख्या पाहता मंत्री मकरंद पाटील यांच्यापुढे उमेदवारी देताना पेच पडल्याशिवाय राहणार नाही. तसेच अनेकांची मनधरणी करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.भुईंज येथील सुधीर भोसले यांच्या पत्नी यापूर्वी पंचायत समितीच्या सभापती राहिल्या आहेत. शिवाय किकली येथील प्रमोद शिंदे यांनीसुद्धा पंचायत समितीची पदे पेललेली आहेत.

तसेच सध्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदसुद्धा प्रमोद शिंदे यांच्याकडे आहे. मंत्री मकरंद पाटील यांचे विश्वासू म्हणूनही त्यांचा मतदारसंघात लौकिक आहे. त्यामुळे भुईंज येथील भोसले घराणे आणि किकली येथील शिंदे घराण्याकडून आगामी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. या दोन्ही घराण्यांव्यतिरिक्ती भुईंज, पाचवड गणातील अनेकांकडून उमेदवारीसाठी मंत्री मकरंद पाटील यांच्या निवासस्थानाकडे फेर्‍या वाढल्याचे चित्र आहे.

कुणी आबांकडे तर कुणी काकांकडे..
आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी कुणी मंत्री मकरंद पाटील म्हणजेच आबांकडे तर कुणी खासदार नितीन पाटील म्हणजेच काकांकडे हट्ट करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

जुन्यांना संधी दिल्यास बंडखोरीची शक्यता
महिला आरक्षणामुळे आरक्षणामुळे पुरुष उमेदवारांची अडचण झाली असली तरी उमेदवारी आपल्या घरातच मिळाली पाहिजे, असा निर्धार इच्छुकांनी केला आहे. विशेष म्हणजे याआधी ज्यांनी पदे उपभोगली, त्यांना उमेदवारी देऊ नये असाही अनेकांचा पवित्रा आहे. त्यामुळे जुन्यांना पुन्हा संधी दिल्यास पाचवड, भुईंज गणात बंडखोरी उफाळल्याशिवार राहणार नाही, असेच सध्याचे राजकीय वातावरण आहे.

डॉ. सुरभी भोसलें यांच्या नावाची चर्चा..
भुईज गणात मंत्री मकरंद पाटील यांच्या गटातील इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळाली तरी नाराजांचा गट तयार होणारच आहे. याशिवाय भुईंज हे मदन भोसले यांचे होमपिच आहे. या गणात दादांच्या कार्यकर्त्यांचा गट आहेच. याशिवाय मदन भोसले यांच्या कन्या डॉ. सुरभी भोसले यांनी गेल्या दीड- दोन वर्षांमध्ये वाढविलेला जनसंपर्क पाहता त्यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

The post Satara Politics : वाईच्या राजकारणात ट्विस्ट! आरक्षणामुळे दिग्गजांचा पत्ता कट, आता पत्नीसाठी जोरदार लॉबिंग appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!