PAK vs SA : निवृत्ती माघार घेतलेल्या क्विंटन डी कॉकचा मोठा धमाका! कोहली-विल्यमसनला मागे टाकत केला खास पराक्रम

Quinton de Kock hits 7000 ODI runs in record time, surpasses Kohli and Williamson
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Quinton de Kock hits fastest 7000 ODI runs : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना फैसलाबाद येथील इक्बाल स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, निवृत्ती माघार घेतलेल्या आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने मोठा पराक्रम करत विराट कोहली आणि केन विल्यमसनला मागे टाकले आहे.

क्विंटन डी कॉकने कोहली-विल्यमसनला टाकले मागे –

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात आपल्या ७००० धावांचा टप्पा पूर्ण केला. यासह, तो वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये हा टप्पा गाठणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. डी कॉकने केवळ १५८ डावांमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या.

या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम अमला आहे, ज्याने १५० डावांमध्ये हा पराक्रम केला होता. यापूर्वी, भारताचा महान फलंदाज विराट कोहली १६१ डावांमध्ये ७००० धावांपर्यंत पोहोचला होता आणि आता तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा केन विल्यमसन १५९ डावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND A vs SA A : ध्रुव जुरेलचा कहर! सलग दोन्ही डावात शतक झळकावत आफ्रिकन गोलंदाजांची उडवली दाणादाण

वनडेत सर्वात कमी डावांमध्ये ७००० धावा पूर्ण करणारे खेळाडू:

  • हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका) – १५० डाव
  • क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – १५८ डाव
  • केन विलियमसन (न्यूझीलंड) – १५९ डाव
  • विराट कोहली (भारत) – १६१ डाव
  • एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) – १६६ डाव
  • जो रूट (इंग्लंड) – १६८ डाव

हेही वाचा – IND vs AUS : अखेरचा सामना रद्द; तरीही भारत विजयी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20I मालिकेतील वर्चस्व कायम

या मालिकेत डी कॉकचा शानदार फॉर्म कायम –

या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्विंटन डी कॉकने बॅटने आपला शानदार फॉर्म दाखवला आहे. त्याने तीन डावांमध्ये फलंदाजी करताना ११९.५० च्या प्रभावी सरासरीने एकूण २३९ धावा केल्या आहेत. यादरम्यान डी कॉकने दोन अर्धशतके आणि एक शतकी खेळी केली. विशेषतः, दुसऱ्या वनडे सामन्यात जेव्हा आफ्रिकेचा संघ २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता, तेव्हा डी कॉकने १२३ धावांची नाबाद मॅच-विनिंग खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. आता त्याने तिसऱ्या सामन्यात ५३ धावा करत संघाला १४३ धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

The post PAK vs SA : निवृत्ती माघार घेतलेल्या क्विंटन डी कॉकचा मोठा धमाका! कोहली-विल्यमसनला मागे टाकत केला खास पराक्रम appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!