पीएम मोदी पुन्हा भूटानच्या राजकिय दौऱ्यावर; मैत्रीचे बंध आणखी मजबूत होणार

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : भारत आणि भूटानमधील विशेष मैत्री आणि सहकार्याचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर २०२५ मध्ये भूटानच्या दोन दिवसीय राजकिय दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी ११ आणि १२ नोव्हेंबर २०२५ रोजी भूटानला भेट देतील. दोन्ही देशांमधील नियमित उच्च-स्तरीय भेटीगाठींच्या परंपरेचा हा भाग आहे.

गेल्या वर्षी ‘ऑर्डर ऑफ ड्रूक ग्यालपो’ सन्मान –
याआधी, मार्च २०२४ मध्येही पंतप्रधान मोदींनी भूटानचा दौरा केला होता. त्यावेळी भूटानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना भूटानचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ ड्रूक ग्यालपो’ (Order of the Druk Gyalpo) प्रदान केला होता. या सन्मानाने गौरवान्वित झाल्यावर पीएम मोदींनी तो १४० कोटी भारतीयांना समर्पित केला होता. भारत आणि भूटानची सामायिक बौद्ध वारसा आणि मूल्यांवर आधारित मैत्री खूप जुनी आणि दृढ आहे.

विकासकार्यांमध्ये भारताचे मोठे योगदान
भारताने १९६० च्या दशकापासूनच भूटानच्या विकासकार्यांमध्ये सक्रिय सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. भारताने भूटानच्या १२व्या पंचवार्षिक योजनेसाठी तब्बल ५,००० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ज्यामुळे ६०० हून अधिक प्रकल्प पूर्ण झाले. या वर्षी सुरू झालेल्या १३व्या योजनेसाठीही भारताने मदत वाढवण्याचे वचन दिले आहे. चीनकडून वारंवार राजनयिक मिशनसाठी निमंत्रण मिळत असले तरी, भूटानने भारताच्या भावनांचा आदर करत या प्रयत्नांना विरोध केला आहे आणि चीनसोबतच्या सीमा विवादावर लक्ष केंद्रित केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या या आगामी दौऱ्यामुळे भारत-भूटान संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता आहे.

The post पीएम मोदी पुन्हा भूटानच्या राजकिय दौऱ्यावर; मैत्रीचे बंध आणखी मजबूत होणार appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!