Pune crime News : नीलेश घायवळ टोळीतील गुंड ठाणे जिल्ह्यातून अटकेत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी नीलेश घायवळ टोळीतील सराइताला खंडणी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातून अटक केली. जयेश कृष्णा वाघ ( ३६, रा. विठ्ठल मंदिरासमोर, केळेवाडी, कोथरूड) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे.

कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. घायवळ टोळीतील गुंड वाघ याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पसार झाला होता.

पसार झालेल्या वाघ याचा शोध घेण्यात येत होता. वाघ हा ठाणे जिल्ह्यातील टिट‌वाळा परिसरात असलेल्या कोंडारी गावात वास्तव्यास असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोंडारी गावात लपलेल्या वाघ याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस कर्मचारी अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमर पवार, नितीन बोराटे, अविनाश कोंडे, बबलू मांढरे, नागनाथ राख यांनी ही कारवाई केली.

The post Pune crime News : नीलेश घायवळ टोळीतील गुंड ठाणे जिल्ह्यातून अटकेत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!