
मुंबई: राज्य सरकारच्या गृह विभागाने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२५ च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७१.०५ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी दिल्याने, अखेर सुमारे ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारी पगार जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जमा होतो. मात्र, या महिन्यात राज्य सरकारने महामंडळाला सवलतमूल्याचा निधी वेळेवर न दिल्याने कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते आणि अनेकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
सवलत योजनेचा निधी –
एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर प्रवाशांसाठी ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत विविध सवलती योजना राबवते. या सवलतींच्या तिकीट भाड्याची प्रतिपूर्ती करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. सरकारने हा निधी दिल्याने आता कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न तात्पुरता सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निधी मिळाल्याने सोमवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे, पण वेळेवर पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. महामंडळाने व सरकारने भविष्यात वेळेवर पगार देण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
The post एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार अखेर सोमवारी जमा होणार appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











