खुशखबर! ८ नोव्हेंबर पासून प्रतिक्षीत प्राध्यापक पदांची भरती सुरू! – Professors Bharti 2025

Pavitra Portal Bharti Merit List

Professors Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांच्या एकूण १११ रिक्त प्रसिद्ध केली आहे. इच्छुक जागांसाठी विद्यापीठाने जाहिरात उमेदवारांना आठ नोव्हेंबर ते सात डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. पुणे विद्यापीठाने यापूर्वी डिसेंबर २०२३ आणि सप्टेंबर २०२४मध्ये या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, विविध प्रशासकीय कारणांमुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलली गेली. राज्यभरातील हजारो पात्र उमेदवारांनी त्या वेळी अर्ज केले होते. भरती प्रक्रिया रखडल्याने पात्रताधारक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. विद्यापीठातील प्राध्यापक पदे दीर्घ काळ रिक्त राहिल्याने अध्ययन-अध्यापन, संशोधन आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पात्रताधारक संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून भरतीस गती देण्यासाठी आंदोलने आणि निवेदने दिली होती. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ऑक्टोबर २०२५मध्ये जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार प्राध्यापक भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार उमेदवारांच्या पात्रतेसाठी २५ गुण आणि मुलाखतीसाठी ७५ गुणांचा गुणभार निश्चित केला आहे. मात्र, प्रसिद्ध निर्णयानुसारच पुणे विद्यापीठाने भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील केंद्रप्रमुख भरती करिता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम डाउनलोड करा.

‘१२ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे द्यावीत’
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार उमेदवारांना आठ नोव्हेंबर ते सात डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्जाची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रशासनातील शिक्षक कक्षाकडे सादर करावीत. यापूर्वी २०२३ आणि २०२४मधील जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात आवश्यक बदल किंवा सुधारणा करण्याची परवानगी दिल्याची माहिती कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी दिली आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 


राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित करण्यासाठी उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. नव्या नियमांनुसार भरती प्रक्रियेत शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य आणि अध्यापन अनुभवाला ७५ टक्के तर मुलाखतीला फक्त २५ टक्के गुणांचे वजन दिले जाणार आहे. या निर्णयामुळे शिक्षण संस्थांवरील राजकीय किंवा बाह्य हस्तक्षेपाला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उमेदवारांच्या पदवी, पदव्युत्तर, एम.फिल., पीएच.डी., संशोधन लेख, पुस्तके, पेटंट आणि पुरस्कारांवर आधारित मूल्यांकन होईल. तसेच आयआयटी, आयआयएम, आयआयएसईआर आणि एनआयटीसारख्या राष्ट्रीय संस्थांतून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे.

मुलाखतीदरम्यान उमेदवारांच्या विषयज्ञान, संवादकौशल्य, सादरीकरणशैली आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणावरील समज यावर गुण दिले जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे — संपूर्ण मुलाखत प्रक्रिया आता व्हिडीओ रेकॉर्डिंगद्वारे पार पडणार असून, सर्व नोंदी समिती सदस्यांच्या स्वाक्षरीसह सीलबंद ठेवण्यात येतील.

शिक्षक असो अथवा प्राध्यापक भरती, आतापर्यंत यामध्ये किती घोटाळे झाले हे अगदी जगजाहीर आहे. प्रत्येकवेळी काही गैरप्रकार समोर आल्यानंतर चर्चा, आरोप होतात. त्यानंतर शासनाकडून काहीतरी नियमावली जाहीर केली जाते. आता निबंध घातलेत पुन्हा अमूक-तमूक गैरप्रकार होणार नाही, असे सांगण्यात येते. मात्र यंत्रणेतील बहाद्दर पुन्हा पठावाट शोधून काढतात, अर्थात यंत्रणेतील काहीजणांचे यासाठी खतपाणी असते. आता प्राध्यापक भरतीमध्ये नवीन नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. मुखालत प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या पद्धतीमुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्ता-केंद्रित होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

The post खुशखबर! ८ नोव्हेंबर पासून प्रतिक्षीत प्राध्यापक पदांची भरती सुरू! – Professors Bharti 2025 appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!