
भोर : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील भोर शहरात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेला भाजपचा बालेकिल्ला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे आणि माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी थेट राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
रामचंद्र आवारे हे भाजपचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संग्राम थोपटे यांनीच काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचेच विश्वासू सहकारी आवारे दांपत्याने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली येण्याचा निर्णय घेतला. हा प्रवेश आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला, तर अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे सांगितले जात आहे.
निर्मला आवारे या मागील दहा वर्षे नगराध्यक्षा आणि नगरसेविका म्हणून काम करत होत्या. सर्वसमावेशक चेहरा, महिलांमध्ये प्रचंड लोकप्रियता आणि शहरात मजबूत पकड, अशा ताकदवान नेत्याचा राष्ट्रवादीला मिळालेला हा प्रवेश म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकीत निर्मला आवारे यांनाच नगराध्यक्षा पदाचा उमेदवार असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडून अजून उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात आहे.
भोरमध्ये आता दुरंगी लढत निश्चित
विधानसभेत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली. आता पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट सामना रंगणार आहे. परिवर्तन निश्चित आहे, असा निर्धार आवारे दांपत्यासह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अजित पवार गटाने भोरमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली असून, यामुळे शहरात राष्ट्रवादीची ताकद झपाट्याने वाढताना दिसतेय.
The post पुण्यात भाजपचा बालेकिल्ला ढासळला; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय समीकरणे बदलणार? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











