
Mahapareshan Result 2025 @mahatransco.in
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमार्फत लोअर डिव्हिजनल क्लर्क पदासाठी एक ऑगस्टला ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा होऊन तीन महिने उलटले, तरीही या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच याबाबत कोणतेही कारण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. राज्यभरात २६० पदांच्या भरीतीसाठी ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील २६ हजार ३३६ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. परीक्षेला ९० दिवस उलटले तरी निकालही जाहीर करण्यात आलेला नाही व पुढील प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्ट माहितीही देण्यात आलेली नाही. ‘IBPS’ मार्फत घेण्यात आलेल्या प्रत्येक परीक्षेचा निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर केला जातो.
परंतु, हा निकाल अद्यापही प्रलंबित आहे. तसेच २३ सप्टेंबरला काढलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘प्रशासकीय कारणास्तव उशीर होत आहे’, इतकेच नमूद केले आहे. या नोटीसलाही आता ४० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे. निकाल लांबण्याचे कारण स्पष्ट करावे किंवा लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी या उमेदवारांमधून होत आहे. याबबात संपर्क साधला असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
Advertisement No. 04/2025 was published on 28.05.2025 for filling the post of Superintending Engineer (Transmission). All candidates who were found apparently eligible as per the pre-requisites mentioned in the advertisement were invited to appear for the first four tools of the Competency Mapping Test, namely In-Basket Exercise, Group Discussion, Case Discussion, and Presentation Skill, which were conducted on 12.10.2025. Considering the eligibility criteria and based on the overall performance of candidates in all four exercises, 15 candidates were shortlisted for the Personal Interview, which was subsequently conducted on 16.10.2025.
Eligible/shortlisted candidates for Personal Interview
Mahapareshan result Update – All the candidates are hereby informed that the process of declaring results and scheduling interviews (as applicable) is currently experiencing a delay due to administrative reasons and the remaining steps in the recruitment process will be completed at the earliest possible time. Mahatransco Bharti Result 2025 Latest Details & Update.
सर्व उमेदवारांना येथे कळविण्यात येते की, महापारेषण पदभरतीचा निकाल जाहीर करण्याची आणि मुलाखतींचे वेळापत्रक (लागू असल्यास) सध्या प्रशासकीय कारणांमुळे विलंब होत आहे आणि भरती प्रक्रियेतील उर्वरित टप्पे शक्य तितक्या लवकर पूर्ण केले जातील. या संदर्भातील पुढील अपडेट्स आम्ही महाभरतीवर प्रकाशित करू.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. हि परीक्षा ३ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती; या भरतीचा निकाल जाहीर झाला असून खालील लिंक वरून आपण आपला नोकल बघू शकता.
- 08/2024 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) – Selection List PDF –
- 10/2023 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) – ST (Special Drive) – Selection List PDF –
The post तीन महिन्यांपासून निकालाची प्रतीक्षा महापारेषण कंपनीचा संथ कारभार; उमेदवार संभ्रमात! – MahaPareshan Results appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











