
Samantha Ruth Prabhu Post | अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मागील दिवसांपासून ती दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र आता त्यांचे नात कन्फर्म झाल्याचे म्हंटले जात आहे. समांथाने नुकतेच दोघांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमधून तिने आपल्या नात्याची हिंट चाहत्यांना दिली.
समंथा प्रभूने नुकतंच स्वत:चा परफ्युम ब्रँड लाँच केला. यात एका फोटोमध्ये, समंथा राजच्या जवळ उभी असल्याचे दिसून आले. ब्लॅक सूटबूट घालून राजने समंथाला आपल्या मिठीत घेतलेलं दिसत आहे. तर त्याच्या एका हातात ड्रिंकचा ग्लास आहे. हा त्यांचा रोमँटिक कोजी फोटो क्षणात व्हायरल झाला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये, राज तिच्या मागे उभा होता आणि तिने तमन्ना भाटियासह इतरांसोबत पोज दिली आहे.
समंथाचे खास कॅप्शन
समंथाने या फोटोंना कॅप्शन देत लिहिले, “कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी करिअरमध्ये काही बोल्ड निर्णय घेतले. रिस्क घेतली, माझ्या अंतरात्मावर विश्वास ठेवला आणि शिकत राहिले. आज मी माझे छोटे छोटे यश साजरे करत आहे. मला हुशार, तेजस्वी, अतिशय मेहनती आणि प्रामाणिक लोक भेटले, त्यांच्यासोबत मला काम करता आलं यासाठी मी आभारी आहे. ही फक्त सुरुवात आहे.” समंथाच्या या पोस्टवर चाहत्यांनी ‘रिश्ता पक्का’ अशा कमेंट्स केल्या आहेत. Samantha Ruth Prabhu Post |
समंथा आणि राज यांनी द फॅमिली मॅन 2 आणि सिटाडेल: हनी बनी मध्ये एकत्र काम केले आहे. ‘सिटाडेल हनीबनी’ सीरिजही राज-डीके यांनी दिग्दर्शित केली होती. याच सेटवर दोघं प्रेमात पडले होते. सध्या समंथा ‘रक्त ब्रम्हांड: द ब्लडी किंगडम’ मध्ये काम करत आहे, ज्यामध्ये आदित्य रॉय कपूर, अली फजल, वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. ‘ Samantha Ruth Prabhu Post |
हेही वाचा:
अशोक सराफ आणि निवेदिता यांची जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र
The post रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब? समंथाने कथित बॉयफ्रेंडसोबत शेअर केला फोटो appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











