महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना प्रताप सरनाईकांचे खुले आव्हान म्हणाले “आधी पुरावे…”

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Vijay Wadettiwar | Pratap Sarnaik | राज्यात सध्या जमीन प्रकरणामुळे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क जवळील असलेल्या ४० एकर जमीन प्रकरणावरून गंभीर आरोप होत आहेत.

हे प्रकरण ताजे असतानाच आता काँग्रेस आमदार नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर एका जमीन प्रकारणावर खळबळजनक आरोप केले आहेत.

सनाईक यांनी मिराभाईंदरमध्ये २०० कोटींची जागा ३ कोटीमध्ये लाटल्याचा आरोप विजय वडट्टेवार यांनी केले आहे. त्यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी वडट्टेवार यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान देत मिश्किल विधान केले आहे.

विजय वडट्टेवारांचा आरोप काय? 

मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेला मिराभाईंदरमधील ४ एकर प्राइम लँड, जिची किंमत बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपये आहे, ती ३ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे, असा आरोप केला आहे. तसेच मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का? असा सवाल करत जर हे होऊ शकते, तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा…! असे म्हणायची वेळ आता आली आहे.

वडट्टेवार यांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले? 

माझी जमीन कुठे आहे बाबा… मी ३ कोटीत घेतली आणि मलाच माहिती नाही? २०० कोटी त्याची किंमत आहे मी सुद्धा खुश झालो एवढ्या स्वतामध्ये मिळाली असेल तर पाहणी करणे गरजेचे आहे, असे मिश्किल विधान मंत्री प्रताप सरनाईक यांनी करण्यात आलेला आरोपांवर एका न्यूज चॅनेलशी प्रतिक्रिया देताना केले आहे. ते पुढे म्हणाले, परंतु ठीक आहे हा विषय जरी वेगळा असेल तरी शेवटी मी राज्याच्या मंत्री आहे, अशा प्रकाराचे गंभीर आरोप जर माझ्यावर होत असेल तर त्याला उत्तर देणे मी कर्तव्य समजतो सध्या तरी माझी कुठेही जमीन नाही, असे म्हणत त्यांनी आरोप फेटाळून लावले.

विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी राज्यामध्ये काम केलेले आहे त्यांची जबाबदारी आहे. कागदोपत्री पुरावे द्यायची त्याचा खुलासा मी करे, असे आव्हान सरनाईक यांनी वडट्टेवार यांना दिले आहे. यामुळे आता विजय वडट्टेवार यासंबंधी पुरावे सादर करणार का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा : वामिकाचा पब्लिसिटी स्टंट? रिक्षात बसली अन्….; व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं?

The post महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना प्रताप सरनाईकांचे खुले आव्हान म्हणाले “आधी पुरावे…” appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!