Video: मुस्लीम असूनही झरीन खानचे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का?; नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Video: मुस्लीम असूनही झरीन खानचे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का?; नेटकऱ्यांना पडला प्रश्न
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते संजय खान यांच्या पत्नी आणि अभिनेत्री झरीन खानचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काल अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. झरीन खान या मुस्लीम असूनही हिंदू पद्धतीने का त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले? असे नेटकरी विचारताना दिसत आहेत.

झरीन खान या काही काळापासून वृद्धत्वाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. त्यांनी काल सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. झरीन यांच्या पश्चात त्यांचे पती आणि मुले सुझान खान, सिमोन अरोरा, फराह अली खान आणि झैद खान हे आहेत. सोशल मीडियावर झरीन खान यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळचा व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यात त्यांचा मुलगा झायद खान हातात मडके घेऊन आणि गळ्यात जनवे घालून दिसत आहे. मात्र, अभिनेत्याला अशा प्रकारे पाहून हा प्रश्न उभा राहिला की आता हिंदू रीतीरिवाजाने अंत्यसंस्कार का केला जात आहे?

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

नेमकं कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, झरीन खान यांची चिता पेटवली गेली आहे. यावर लोकांचा प्रश्न आहे की जर झरीन खान पारशी होत्या आणि संजय खान मुस्लिम धर्म मानतात, तर मग त्यांचा हिंदू रीतीरिवाजाने अंत्यसंस्कार का केला गेला. याचे कारण हे आहे की झरीन खान यांची इच्छा होती की त्यांचा अंत्यसंस्कार हिंदू रीती-रिवाजानुसार व्हावा.

अंत्यसंस्कार का झाले?

प्रत्येक धर्मात माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्याची पद्धती ही वेगळी असते. सर्वसामान्यपणे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात मृतदेहाला दफन किंवा अग्नी दिला जातो. पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची प्रथा फारच वेगळी आहे. पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला दफन करत नाही किंवा मृतदेहाला अग्नीही दिला जात नाही. पारसी समाजातील एखाद्याचा मृत्यू झाला की त्याचा मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे दख्मा येथे नेला जातो. गिधाड हा मृतदेह खाऊन टाकतात. पण झरीन खान यांची इच्छा होती की त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावेत म्हणून ना मुस्लीम ना पारशी पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!