उद्धव ठाकरेंचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, कोणतेही बटन दाबा पण मत…

उद्धव ठाकरेंचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, कोणतेही बटन दाबा पण मत…
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

उद्धव ठाकरे मराठवाडा दाैऱ्यावर आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना दिसले. आज परभणीच्या दाैऱ्यावर असून त्यांच्या मराठवाडा दाैऱ्याची सांगता आहे. मागील चार दिवसांपासून ते मराठवाड्याच्या दाैऱ्यावर होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दाैऱ्यावर आहेत. पार्थ पवारच्या जमीन घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरेंची मोठे विधान केले. भाजप सांगतंय तुम्ही कोणतेही बटन दावा मत तर भाजपालाच जाणार… अशी लोकशाही आपल्या देशात आहे. 100 वर्षात मराठवाड्यावर असे कधीही संकट आले नाही. मतचोरीनंतर हे आता जमीन चोरी करत आहेत.

तुम्ही सर्व शेतकरी आहात ना? माझ्यासारखे शहरीबाबू नाहीत ना? मी खरं सांगतो की, मला शेतीमधील काहीच कळत नाही. आता जर कर्जमुक्ती केली नाही तर मग कधी करणार? खरडून जमीन गेली आहे, तरीही इकडे कोणी यायला तयार नाही. पूर्ण माती वाहून गेली. सर्व बोगस कार्यभार आहे. मतचोरीशिवाय सरकारला दुसरा कोणताच पर्याय नाही. वेळ आली तर धोंडे मारा, असे मी असे म्हणणार नाही.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्रीय पथक तुमच्या दारात आले की, नाही? परदेशी समिती आली की नाही? मग जुलैपासून परदेशी झोपले का? केंद्रीय पथक आता येऊन गेले. केंद्रीय समिती तुमच्याकडे येणार नाही. आता निवडणुका आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या हाताला पाने पुसण्यासाठी कोणते तरी पॅकेज आणतील. यावेळी देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये काय बोलत होते, हे सांगताना उद्धव ठाकरे दिसले. पंतप्रधानांचे सर्वात जास्त प्रेम बिहारवर आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले, त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे दिसले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करतो की, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्ही सर्व देशातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये 10 हजार टाका. बिहारमधील महिलांच्या खात्यामध्ये 10 हजार टाकले. शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे दिसले. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली. सिमेंट कारखान्यासाठी अदानीला सिमेंट कंपनीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियम बदलून कल्याण-डोंबिवलीमध्ये जागा दिली. जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा दाबत नाहीत, तोपर्यंत तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही.

गहू तांदूळ सडका मिळतो, त्याला शिजून त्याला खाऊ घाला आणि म्हणा खा-पी मात्र आमचा काम कर. आमचे पंचनामे पूर्ण कर नंतर आम्ही तुला सोडतो, मोदीजींनी नोटबंदी केली, तशी महायुतीसाठी तुम्हाला वोट बंदी करावी लागेल. नुकसान भरपाई कर्जमुक्ती होईपर्यंत महायुतीला मत नाही. सातबारा कोरा करू असं म्हटले होते, कर्जमुक्ती होईपर्यंत तुम्हाला मतदान नाही असं म्हणल्याशिवाय गुडघ्यावर येणार नाहीत, आत्महत्या करू नका घरदार उघडं पडते, आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाही वाढतात, काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!