“…त्यावेळी मी नैतिकतेने राजीनामा दिला होता”; खडसेंचा दावा खोडून काढत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट म्हणाले “दिल्लीतून…”

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Girish Mahajan : पुण्यातील कोरगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले एकनाथ खडसे यांचे भोसरी भूंखड प्रकरण चर्चेत आले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना मंत्री पदावर होते, त्यावेळी हे प्रकरण समोर आले आणि खडसेंना मंत्रिपदावर पायउतार व्हावे लागले. त्यावेळी नैतिकतेने राजीनामा दिला होता, असे खडसे म्हणाले आहेत.

सध्या पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणी आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणावर खडसेंनी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांनी केलेला दावा खोडून काढत भोसरी भूखंडाशी संबंधित मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा नैतिकतेमुळे दिला नव्हता. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. अन्यथा पक्षातून हकालपट्टीची धमकी देण्यात आली होती, असा मोठा दावा महाजन यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगाव येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

कसली नैतिकता? त्यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर नव्हता. माझ्यासमोरचा हा विषय आहे. जेव्हा त्यांचे प्रकरण (भोसरी भूखंड) उघडकीस आले, तेव्हा त्यांना थेट दिल्लीहून सूचना देण्यात आल्या होत्या. ‘तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल’.

हेही वाचा : स्थानिक निवडणुकीसाठी राजकीय खेळी? चंद्रकांत पाटलांनी मोजक्याच शब्दांत स्पष्टचं सांगितलं म्हणाले…

The post “…त्यावेळी मी नैतिकतेने राजीनामा दिला होता”; खडसेंचा दावा खोडून काढत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट म्हणाले “दिल्लीतून…” appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!