Mohan Bhagwat : RSS शताब्दी सोहळा, सरसंघचालक मोहन भागवतांचे बंगळुरूमध्ये विशेष व्याख्यान

Mohan Bhagwat : RSS शताब्दी सोहळा, सरसंघचालक मोहन भागवतांचे बंगळुरूमध्ये विशेष व्याख्यान
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) शताब्दी समारंभाने देशभरात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमीच्या दिवशी शताब्दी समारंभ पूर्ण केला. या शताब्दी वर्षात, त्यांनी देशभरात विजयादशमी उत्सव, युवा मेळावे, घरोघरी जाऊन प्रचार, हिंदू मेळावे, सामाजिक सौहार्द वाढवणे आणि प्रमुख नागरिकांशी चर्चा असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी समारंभ उत्साहात साजरा होत आहे. 2 ऑक्टोबर 2025 रोजी, विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शताब्दी समारंभ केला. या शताब्दी वर्षात, त्यांनी देशभरात विजयादशमी उत्सव, युवा मेळावे, घरोघरी जाऊन प्रचार, हिंदू मेळावे, सामाजिक सौहार्द वाढवणे आणि प्रमुख नागरिकांशी चर्चा असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. १०० व्या वर्षात, संघ प्रमुख व्यक्ती, धोरणकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आपले विचार मांडत आहे. याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे 8 -9 नोव्हेंबर रोजी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एका विशेष व्याख्यान कार्यक्रमात भाषण होणार आहे.

“संघाची 100 वर्षे: नवीन क्षितिजं”

“संघाची 100 वर्षे: नवीन क्षितिजेॉं” या मालिकेतील, दुसरे व्याख्यान हे शनिवार (8 नोव्हेंबर) आणि रविवार (9नोव्हेंबर) रोजी पीईएस विद्यापीठ, होसाकरेहल्ली रिंग रोड, बनशंकरी, बेंगळुरू येथे आयोजित केले जाईल. हा कार्यक्रम, जो फक्त निमंत्रितांसाठी खुला आहे. 8 व 9 नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी सुमारे 1200 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ यासारख्या दक्षिणेकडील राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. या व्याख्यानमालेसाठी शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला, विज्ञान, प्रशासन, पत्रकारिता, क्रीडा, उद्योग, समाजसेवा आणि अध्यात्म यासारख्या जवळजवळ सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

शताब्दी वर्षात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दिल्ली, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता, देशभरातील या चार प्रमुख शहरांमध्ये व्याख्याने देणार आहेत. “संघाच्या प्रवासाची 100 वर्षे: नवीन क्षितिजे” या शीर्षकाखाली व्याख्यानांची मालिका आयोजित केली जाईल. पहिले व्याख्यान 26,27, आणि 28 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. तर या मालिकेतील दुसरे व्याख्यान हे आता बंगळुरू येथे आयोजित केले जात आहे.

याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!