MPSC साठी नवीन अध्यक्षांचा शोध सुरू, अर्ज सुरु..

MPSC Updates 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ लवकरच निवृत्त होणार असल्याने राज्य शासनाने नवीन अध्यक्षांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांकडे दिली जाते. त्यामुळे यावेळी राज्य सरकार कुणाच्या नावाची शिफारस करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची २०२३ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळानंतर ते आता निवृत्त होणार आहेत. शासन निर्णयानुसार या पदासाठी अर्हता पूर्ण करणाऱ्या, तसेच अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येतात. २८ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

 


 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण १६४ पदांचा अंतिम निकाल ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडीत शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नसल्यामुळे, शासनाने आयोगाकडे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची शिफारस करण्याची विनंती केली होती. 

 

आयोगाने शासनाकडून प्राप्त रिक्त प्रवर्गनिहाय पदे, गुणवत्ताक्रम व वर्गवारी विचारात घेऊन १९ पदांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची शिफारस केली आहे. या उमेदवारांचा निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mpsc.gov.in प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रतीक्षा यादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची नियुक्ती ही त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहणार आहे.

MPSC Exam


आपल्याला माहीतच असेल आताच काही दिवस आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकतीच ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५’ या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत चार संवर्गासाठी एकूण ९३८ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीमध्ये ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ (एएमव्हीआय) या पदाचा पुन्हा एकदा समावेश न झाल्याने स्पर्धा परीक्षार्थीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सलग पाच वर्षांपासून या पदासाठी एकही जाहिरात निघाली नसल्याने हजारो उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून यांत्रिकी अभियंता पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात शासकीय नोकरीच्या जाहिरातींचा ओघ जवळपास थांबलाच आहे. विशेषतः परिवहन विभागातील भरती तर अक्षरशः ठप्प झाली आहे. 

दोन जूनच्या माहिती अधिकारातील (आरटीआय) उत्तरानुसार, ‘एएमव्हीआय’ पदाच्या ६८ जागा रिक्त आहेत. सप्टेंबरमध्ये ३३१ ‘एएमव्हीआय’ अधिकाऱ्यांना मोटार वाहन निरीक्षकपदी (एमव्हीआय) पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे ‘एएमव्हीआय’ पदांच्या ३३१ जागा रिक्त झाल्या आहेत. याशिवाय जुलै २०२५ च्या परिपत्रकानुसार आठ नवीन उपप्रादेशिक कार्यालयांसाठी ६० नवीन ‘एएमव्हीआय’ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या सगळ्याचा एकत्रित विचार करता परिवहन विभागात ४६० पेक्षा जास्त ‘एएमव्हीआय’ पदे रिक्त आहेत. मात्र आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये या संवर्गाचा समावेश नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, “परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात ‘एएमव्हीआय’ पदे रिक्त आहेत. मात्र जाहिरातीमध्ये या संवर्गाचा समावेश नाही, ही शोकांतिका आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘एएमव्हीआय’ची जाहिरात आलेली नाही. माझ्यासारख्या हजारो मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे वय वाढत चाललं आहे. सरकारला आमचं भविष्य दिसत नाही का ?”

 

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीदरम्यान केली जाते. त्यामुळे अनेकदा खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे उमेदवार नोकरीवर लागल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे आता कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीपूर्वीच केली जाणार असून उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार संबंधित कागदपत्रे दिल्याशिवाय अर्जच सादर करता येणार नाही. एमपीएससीने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारांकडून पात्रतेचा दावा असलेला अर्ज केला जात होता. उत्तीर्ण उमेदवाराच्या कागदपत्रांची मुलाखतीदरम्यान पडताळणी केली जात होती. आता पात्रतेच्या पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पदभरती प्रक्रियेत उमेदवारांकडून भूकंपग्रस्त, खेळाडू, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी असल्याचे दावे सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहेत. 


त्यानंतर ‘एमपीएससी’ च्या कक्षेत सर्व पदे आणून १ जानेवारी २०२६ नंतर गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’ कडून होणार आहे. यानुसार, एमपीएससीने कार्यवाही सुरू केली आहे. केरळ राज्यातील सर्व परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. त्यामुळे ‘एमपीएससी’चे सदस्य आणि का अधिकाऱ्यांनी नुकतीच केरळ आयोगाची भेट घेऊन तेथील परीक्ष पद्धतीचा अभ्यास केला. यावेळ सकारात्मक बैठकही घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामु राज्यातील सर्व परीक्ष ‘एमपीएससी’ मार्फत होण्याच शक्यता आहे. यासंदर्भात आयोगातील अधिकाऱ्यांशी संपर्क  केला असता त्यांनी परीक्षा हि एक  गोपनिय बाब असल्याने तुर्तास विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकर दिला.

 

केरळ लोकसेवा आयोग कसा आहे आणि काय आहे कार्य पद्धती?

एमपीएससीप्रमाणेच केरळ लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था आहे. केरळ राज्य शासनाची सर्व कार्यालये, ज्यामध्ये केरळ राज्य वीज मंडळ, केरळ राज्य परिवहन मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, १५ शिखर सहकार संस्था व जिल्हा सहकारी संस्था, केरळ राज्याच्या सर्व कंपन्या आणि मंडळे आदी सर्व विभागांतील रिक्त पदांची भरती केरळ लोकसेवा आयोगाकडूनच होते. वर्षाला १५ ते २० हजार पदांची भरती केली जाते. त्यांच्या आयोगाची सदस्य संख्या २० असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या १६०० आहे.

पसेंटाइल म्हणजे काय ?
पसेंटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची एखाद्या विशिष्ट मूल्याच्या खाली असणाऱ्या संख्यात्मक मूल्यांची टक्केवारी. सोप्या भाषेत सांगायचे तर, पसेंटाइल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा स्कोअर किती जणांपेक्षा जास्त आहे, हे दाखवणारी टक्केवारी. उदाहरणार्थ समजा एखाद्या परीक्षेत १०० विद्यार्थी बसले आणि तुम्हाला २० पसेंटाइल आहेत, तर याचा अर्थ असा की, तुमच्यापेक्षा कमी गुण २० विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. उमेदवारांना आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागेल. एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवणेही आवश्यक आहे. उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. यामुळे उमेदवारांची ओळख अचूक होईल, फसवणूक व चुकीच्या माहितीला आळा बसेल. भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येईल.

The post MPSC साठी नवीन अध्यक्षांचा शोध सुरू, अर्ज सुरु.. appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!