Parth Pawar Land Scam Controversy : जमीन गैरव्यवहार प्रकरण, शीतल तेजवानी फरार ? फोन बंद, घरातही…

Parth Pawar Land Scam Controversy : जमीन गैरव्यवहार प्रकरण, शीतल तेजवानी फरार ? फोन बंद, घरातही…
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण सध्या खूप गाजतंय. कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 1800 कोटी मूल्य असलेली जमीन 300 कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे 500 रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत पार्थ पवार, त्यांचे वडील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

पार्थ पवार अडचणीत सापडलेल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणात आत्तापर्यंत शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू, या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी या फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कुठे आहे शीतल तेजवानी ?

मिळालेल्या माहितानुसार, बावधन पोलीस ठाण्यत शीतल तेजवानी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी ही शीतल तेजवानी यांच्याकडे होती, त्यामुळे तेजवानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिचा फोन बंद आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!