Satara News : पालिकेची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ; निवडणूक निर्णय अधिकारी बारकुल यांची माहिती

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
सातारा – सातारा पालिका निवडणुकांच्या संदर्भात लागू झालेल्या आचारसंहिता आणि त्या संदर्भात पाळावयाचे नियम तसेच संबंधित भरारी पथके व उमेदवारांनी पाळावयाचे नियम याबाबतची माहिती साताऱ्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत आशिष बारकुल यांनी सातारा नगरपालिकेच्या बैठकीत दिली .तसेच पालिकेच्या मतदानानंतरची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये 3 डिसेंबर रोजी गोडाऊनमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार समीर यादव, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक व नगर प्रशासन समन्वयक मोहन प्रभुणे, सातारा पालिकेच्या निवडणूक शाखेचे प्रमुख विश्वास गोसावी, सातारा पालिकेच्या दोन्ही आघाड्यांचे माजी पक्षप्रतोद एड. दत्ता बनकर, अविनाश कदम, सचिन पिरोडकर तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.आशिष बारकुल यांनी सांगितले की, उमेदवारांनी दिनांक 10 ते 17 नोव्हेंबर यादरम्यान आपली आवेदन पत्र mahaseclec.inया संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

ऑनलाइन पद्धतीने भरलेले नामनिर्देशन पत्र ते सदस्य पद किंवा थेट नगराध्यक्ष पदाचे अर्ज सुद्धा ऑनलाईन भरावयाचे आहेत याबाबतचे अर्ज सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये स्वीकारण्यात येतील नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नोंदणीकृत उमेदवारांची जोडपत्र एक व दोन जोडून नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी आणि नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक जिथे अपील नसेल तेथे 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असेल निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध दि. 26 नोव्हेंबर रोजी असणार आहे.

मतदानाचा दि. 2 डिसेंबर 2025 असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये नवीन एमआयडीसी कोडोली येथे होणार आहे. आदर्श आचारसंहिता ही 30 नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून राहील नामनिर्देशन भरल्यापासून ते मतमोजणीपर्यंतच्या कालावधीमध्ये आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा पंधरा लाख व नगरसेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा पाच लाख रुपये असणार आहे. प्रांत आशिष बारकुल यांनी राजकीय प्रतिनिधींच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली .

The post Satara News : पालिकेची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ; निवडणूक निर्णय अधिकारी बारकुल यांची माहिती appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!