Pune News : शेतकऱ्यांना फसवून जमीन हडपली; मुंढवा प्रकरणी पार्थ पवारांची चौकशी करा, ठाकरे गट आक्रमक

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुंढवा येथील ४० एकर महार वतन तसेच शासनाची मालकी असलेल्या जमिनीची विक्री केली आहे. ॲमेडिया कंपनीने ही जमीन खरेदी केली असून त्याचे भागीदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार यांच्यासह त्यांचे नातेवाईक दिग्विजयसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच या प्रकरणाची इडीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना दिले. यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर संघटक सुरज मोराळे, उपशहरप्रमुख आबा निकम, मकरंद पेटकर,पराग थोरात,संजय वाल्हेकर,निलेश वाघमारे,राहुल शेडगे, विलास सोनवणे, राजेश मोरे,अभिषेक जगताप, आतिश अनारसे ,गिरीश गायकवाड,अतुल कवडे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची फसवणूक करून सदर खरेदीखत करण्यात आले. शेतकऱ्यांना असे सांगण्यात आले कि तुमची जमीन सरकारकडे आरक्षित आहे. ती जमीन आम्ही सरकारकडून सोडवून देण्यासाठी आमच्याशी करारनामा करावा लागेल. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन खरेदी केली. तसेच सरकारकडून मुद्रांक शुल्काची माफी देण्यात आली. मुद्रांक शुल्काबाबत प्रशासनाने गुन्हा दाखल केला, हा विरोधाभास आहे. शासकीय जमीन असताना खरेदी विक्री व्यवहार कसा होतो, असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला.

The post Pune News : शेतकऱ्यांना फसवून जमीन हडपली; मुंढवा प्रकरणी पार्थ पवारांची चौकशी करा, ठाकरे गट आक्रमक appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!