Maval Politics : वडगावात युतीच्या चर्चांना पूर्णविराम! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार – आमदार शेळके

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यात लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत या तीन ठिकाणी निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळ नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.जांभुळ फाटा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वडगाव मावळ नगरपंचायतीची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढवेल, असे आमदार शेळकेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, वडगाव नगरपंचायतीच्या १७ नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची शक्यता फेटाळत स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

The post Maval Politics : वडगावात युतीच्या चर्चांना पूर्णविराम! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार – आमदार शेळके appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!