Mulshi Politics : पिरंगुट गणात सत्तेसाठी चुरस! चारही प्रमुख पक्ष मैदानात, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरू

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पिरंगुट –
मुळशी तालुक्यातील औद्योगिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पिरंगुट पंचायत समिती गणात येणार्‍या निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप या चारही पक्षांचे इच्छुक प्रचारयुद्धासाठी सज्ज झाले आहेत.2017 च्या निवडणुकीत या गणात अटीतटीची लढत झाली होती.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राधिका कोंढरे यांनी शिवसेनेच्या संगीता पवळे यांचा केवळ 387 मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला होता. त्या वेळी झालेल्या मतदानात 13 हजार 696 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राधिका कोंढरे यांना 6109 मते, तर संगीता पवळे यांना 5722 मते मिळाली होती. भाजपच्या विमल मारणे यांना 1203, काँग्रेसच्या नंदा मारणे यांना 252, तर भारिप बहुजन महासंघाच्या लिलाबाई मरगळे यांना 223 मते मिळाली होती.

या गणात पिरंगुट गावातील प्रभाग क्रमांक 2 ते 6, लवळे आणि कासारआंबोली गावांचा समावेश आहे. सध्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे. या गणात सर्वाधिक इच्छुक हे पिरंगुट गावातीलच असल्याने स्पर्धा अधिक तापली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील इच्छुकांची संख्या सर्वाधिक असून, पक्षांतर्गत समतोल राखून उमेदवारी जाहीर करणे हे नेतृत्वासमोरचे आव्हान ठरणार आहे.

हे आहेत इच्छुक..
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून माजी उपसरपंच रामदास गोळे, माजी सरपंच रमेश पवळे, महादेव गोळे, मोहन निकटे, सुनील वाडकर, सर्जेराव तांगडे हे इच्छुक आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी उपतालुका प्रमुख वैभव पवळे आणि ज्येष्ठ नेते नानासाहेब शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)**कडून युवक कार्याध्यक्ष राहुल पवळे हे इच्छुक आहेत. भाजपकडून माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, सचिन धुमाळ, सुनील शिंदे आणि वर्षा सातव यांची नावे पुढे येत आहेत. शिवसेनेकडून उमेदवार निवडीची चाचपणी सुरू असून, काँग्रेस अद्याप उमेदवाराच्या शोधात आहे.

The post Mulshi Politics : पिरंगुट गणात सत्तेसाठी चुरस! चारही प्रमुख पक्ष मैदानात, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरू appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!