मोठी बातमी! दादरच्या स्टार मॉलची भयावह आग अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर, 5 जवानांचा श्वास गुदमरला

मोठी बातमी! दादरच्या स्टार मॉलची भयावह आग अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर, 5 जवानांचा श्वास गुदमरला
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Star Mall Fire: मुंबईतील दादर येथील स्टार मॉलमध्ये आज (शुक्रवार) दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. दुपारी साडेतीन वाजता स्टार मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मॅकडोनल्ड्सच्या किचनमध्ये ही आग लागल्याची घटना घडली आहे. अशातच आता ही आग अग्निशमन दल जवानांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

5 कर्मचाऱ्यांचा धुरामुळे श्वास गुदमरला

समोर आलेल्या माहितीनुसार, दादर येथील स्टार मॉलमध्ये लागलेली आग विझवताना आज अग्निशमन दलाच्या 5 कर्मचाऱ्यांचा धुरामुळे श्वास गुदमरला आहे. एक फायर स्टेशन ऑफिसर आणि चार फायरमन अशा पाचही जणांना सध्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या पाचही जणांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास स्टार मॉल येथे लागलेली आग साधारण दोन ते तीन तासांनी विजवण्यात यश मिळाले आहे. मात्र या आगीवर नियंत्रण मिळवत असताना अग्निशमन दलातील जवानांना तेथील धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास झाला, त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आली आहे. या पाचजी जवानांची प्रकती स्थिर आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

आग लागल्यानंतर पळापळ

दादरमधील शिवाजी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर स्टार मॉल आहे. या मॉलच्या पहिल्या मजल्यावर मॅकडोनल्ड्स रेटॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन मुला-मुलींची गर्दी असते. मात्र आज दुपारी अचानक मॅकडोनल्ड्समधील स्वयंपाकघरात आग लागली. ही आग दिसताच कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. या घटनेनंतर काहीवेळ मॉलमध्ये गोधळ उडाला होता. लोक सगळीकडे पळत होते.

आग लागताच या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली, त्यानंतर काही काळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. मात्र मोठ्या प्रमाणातील धुरामुळे कर्मचाऱ्यांना आग विझवताना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र अथक परिश्रमानंतर आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र या घटनेत अग्निशमन दलाच्या 5 कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरल्याची माहिती समोर आली आहे.

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!