IND A vs SA A: पहिल्या डावात टीम इंडिया पडली अफ्रिकेवर भारी, दुसऱ्या दिवशी गोलंदाजांची कमाल

IND A vs SA A: पहिल्या डावात टीम इंडिया पडली अफ्रिकेवर भारी, दुसऱ्या दिवशी गोलंदाजांची कमाल
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

भारत ए आणि दक्षिण अफ्रिका ए संघात दोन सामन्यांची औपचारिक कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना 255 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 221 धावा करू शकला. दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली. दक्षिण अफ्रिकेने 47.3 षटकात सर्व गडी गमवून 221 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेकडून एमके अकरमॅन हा सर्वात मोठी खेळी करण्यास यशस्वी ठरला. त्याने 118 चेंडूत 134 धावांची खेळी केली. या शिवाय एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.

भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ खऱ्या अर्थाने गाजवला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक विकेट काढल्या. त्याने 11.3 षटकात तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद सिराज आणि आकाशदीपने प्रत्येकी 2 विकेट काढल्या. कुलदीप यादव आणि हर्ष दुबेने प्रत्येकी एक विकेट काढली. भारताला पहिल्या डावात 34 धावांची आघाडी मिळाली. या धावांच्या पुढे खेळताना दुसऱ्याचा दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 गडी गमवून 78 धावा केल्या आहेत. भारताच्या खात्यात 112 धावा असून केएल राहुल नाबाद 26, तर नाईट वॉचमन म्हणून कुलदीप यादव मैदानात उतरला आहे. त्याने 4 चेंडूंचा सामना करत 0 धावा केल्या आहेत.

दुसऱ्या डावाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताला पहिला धक्का 5 धावांवरच बसला. अभिमन्यू ईश्वरनने 3 चेंडूंचा सामना केला. पण त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात उतरला. त्याने 38 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कल 42 चेंडूत 3 चौकार मारत 24 धावांवर बाद केला. भारताने दुसऱ्या डावात 250 पार धावा केल्या तर त्या गाठणं दक्षिण अफ्रिकेला कठीण जाईल. त्यामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ खूपच महत्त्वाचा असणार आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!