फॅशन म्हटलं की कधी, काय घडेल याचा काही पत्ता नाही. त्यामुळे फॅशनची दुनिया ही अजब गजब असल्याचे कायमच म्हटलं जाते. आपण रोज साडी सांभाळण्यासाठी किंवा ओढणी सांभाळण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करतो.
या सेफ्टी पिनची किंमत साधारण १० रुपयांपासून जास्तीत जास्त ५० रुपयांपर्यंत असते. विशेष म्हणजे या किंमतीत आपल्याला साधारण डझनभर सेफ्टी पिन तरी मिळतातच, पण जर हेच सेफ्टी पिन ६९ हजाराला विकत असेल तर… धक्का बसेल ना. पण खरंच असा प्रकार घडला आहे.
फॅशनच्या दुनियेत बुद्धी चालत नाही, फक्त ब्रँडचा टॅग चालतो हे इटलीतील सुपर-लक्झरी ब्रँड प्राडाने (Prada) पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोणत्याही सामान्य दुकानात १० रुपयांना डझनभर मिळणारी सेफ्टी पिन या ब्रँडने तब्बल ६९ हजार रुपयांना लाँच केली आहे.
प्राडाने या साध्या पिनला 'सेफ्टी पिन ब्रोच' (Safety Pin Brooch) असे नाव दिले आहे. त्यांच्या वेबसाईटवर या सेफ्टी पिनची किंमत ७७५ डॉलर म्हणजे भारतीय चलनात अंदाजे ६८ हजार ७२४ रुपये इतकी आहे.
ही किंमत ऐकून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पिनमध्ये असं नेमकं काय आहे, ज्यामुळे ती इतक्या महागड्या दरात विकली जात आहे? ही पिन चंद्रावरून आणली आहे का? असे अनेक प्रश्न केले जात आहेत.
प्राडाने लाँच केलेली ही पिन सोनेरी रंगाची आहे. तिला थोडं आकर्षक बनवण्यासाठी त्यावर रंगीत लोकरासारख्या धाग्यांनी डिझाईन त्यावर डिझाईन केले आहे. त्यावर एक छोटासा प्राडाचा (Prada) चार्मही लावण्यात आला आहे.
प्राडाने ही सेफ्टी पिन लाँच करताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. अनेकांनी यावर प्राडाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. “तुम्ही तुमच्या पैशांचं काय करत आहात? काही कल्पना नसेल तर आम्हाला द्या! अशा शब्दात एका सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरने प्राडाला सुनावलं आहे.
यावर एकाने यापेक्षा चांगली डिझाईन तर माझी आजी ५ मिनिटांत बनवून देईल, फक्त त्यावर प्राडाचा टॅग नसेल. तर दुसऱ्याने आता सेफ्टी पिनसाठीही इन्शुरन्स घ्यावा लागेल, असे म्हटले आहे. दरम्यान प्राडाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, फॅशनच्या दुनियेत तर्क चालत नाही, तर टॅग चालतो. ब्रँडिंगच्या जादूमुळे कोणतीही वस्तू सहज विकता येऊ शकते, याचे हे उदाहरण आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.



















