माझ्या पतीला दारू पाजली अन्…, जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणात अमोल खुणेच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

माझ्या पतीला दारू पाजली अन्…, जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणात अमोल खुणेच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा आरोप होत आहे, या प्रकरणात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, दरम्यान तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना पोलिसांनी दोन संशयितांना अटक केलं आहे. अमोल खुणे आणि दादा गरुड अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. अमोल खुणे हा बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावातील रहिवासी आहे. दरम्यान अमोल खुणे याच्या अटकेनंतर आता प्रथमच त्याच्या पत्नीची आणि आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.

माझ्या पतीला अडकवलं जात आहे, ते मनोज जरांगे पाटलांबाबत एकही चुकीचा शब्द सहन करत नव्हते,  माझ्या पतीच्या रक्तात गद्दारी नाही, त्यांना दारू पाजून फसवलं. जरांगे पाटील आणि माझ्या पतीने एका ताटात शिळ्या भाकरी खाल्ल्या आहेत,  जरांगे पाटलांना भेटून मला त्यांच्याशी बरंच काही बोलायचं आहे, असं अमोल खुणे याच्या पत्नीने म्हटलं आहे. तर  माझा मुलगा असं करूच शकत नाही, असं अमोल खुणेच्या आईने म्हटलं आहे.

दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्यानंतर   अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमोल खुणे हा गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचा रहिवासी आहे, पोलिसांनी अमोल खुणे याच्या घरी जाऊन त्याच्या घराची तपाणी केली आहे.

धनंजय मुंडेंवर आरोप    

दरम्यान या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनीच माझ्या हत्येची सुपारी दिली आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यानंत धनंजय मुंडे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

 

 

 

 

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!