MPSC Group C & Talathi Bharti 2026: 5,707 पदांची मेगा भरती – Apply Online | तलाठी भरती 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MPSC Group C & Talathi Bharti 2026 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी 5,707 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 5 ऑगस्ट 2026 पर्यंत MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने महाराष्ट्र गट-क सेवा भरती २०२६ मध्ये मोठी पदवाढ केली आहे. सुरुवातीला २,६१९ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र, नवीन शुद्धीपत्रकानुसार ३,०८८ नवीन पदांची भर करण्यात आली असून आता एकूण ५,७०७ रिक्त पदांवर भरती होणार आहे.

या भरतीमध्ये तलाठी (ग्राम महसूल अधिकारी), लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशा विविध पदांचा समावेश आहे.

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल. प्रथम १०० गुणांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा होईल. पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी OMR पद्धतीने घेण्यात येणार आहे.

वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान १८/१९ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रोफाइल तयार करावे आणि ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड करणे आणि परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२६ आहे.

हे पण वाचा : Adivasi Vibhag Chowkidar Admit Card 2026: आदिवासी विकास विभाग चौकीदार प्रवेशपत्र जाहीर; Download Link

Maharashtra Public Service Commission (MPSC)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2026

जाहिरात क्र : 017/2026

MPSC Group C & Talathi Recruitment 2026 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
एकुण जागा5,707

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू27/07/2026
अंतिम तारीख05/08/2026
ऑनलाइन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक05/08/2026
चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक08/08/2026
परिक्षा25/10/2026

अर्ज शुल्क

Open (Unreserved)₹394
Reserved / Orphan / EWS₹294
Ex-Servicemen₹44

MPSC Group C & Talathi Bharti 2026 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

(मूळ जाहिरात क्र. ०१७/२०२६ नुसार)

पद क्र.पदाचे नावविभागएकूण पदे
1.उद्योग निरीक्षक (Industry Inspector)उद्योग ऊर्जा व कामगार विभाग09
2.तांत्रिक सहायक (Technical Assistant)वित्त विभाग03
3.कर सहायक (Tax Assistant)वित्त विभाग282
4.सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)गृह विभाग461
5.लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist)मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये1864
Total Post2,691

Talathi Bharti 2026:  तलाठी भरती 2026

नवीन पदे (२२ जुलै २०२६ च्या शुद्धीपत्रकानुसार)

पद क्र.नवीन समाविष्ट पदाचे नावविभागएकूण पदे
1.ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)महसूल व वन विभाग1,539
2.सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारीकृषि व प. दु. म. विभाग254
3.लिपिक-टंकलेखक (वेगवेगळे विभाग)नागरी पुरवठा, महसूल इ.1,263
4.वरिष्ठ लिपिक / अभिलेखपालराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग11
5.सहायक अधीक्षकराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग11
एकूण (नवीन पदे)3,088

MPSC Group C & Talathi Notification 2026 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक
  • इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
कर सहायक
  • पदवीधर
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
सहायक मोटार वाहन निरीक्षक
  • 10वी उत्तीर्ण
  • ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
लिपिक-टंकलेखक
  • पदवीधर
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
ग्राम महसूल अधिकारी तलाठी)
  • कोणत्याही शाखेतील पदवी.

 

वरिष्ठ लिपिक / वरिष्ठ अभिलेखपाल
सहायक अधीक्षक
तांत्रिक सहायक

MPSC Group C & Talathi Bharti 2026: 01/08/2026 रोजी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

MPSC Group C & Talathi Bharti 2026: साठी निवड प्रक्रिया

  • संयुक्त पूर्व परीक्षा: १०० गुणांची वस्तुनिष्ठ (MCQ) परीक्षा.
  • मुख्य परीक्षा: ४०० गुणांची परीक्षा (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी ३०० गुण).
  • टंकलेखन चाचणी: लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी आवश्यक.
  • शारीरिक मोजमाप: फक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी.
  • कागदपत्र पडताळणी: निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

MPSC Group C & Talathi Bharti 2026: साठी अर्ज कसे करावे?

  1.  MPSC च्या https://mpsconline.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करा.
  2. आपले प्रोफाईल (Profile) पूर्ण करा आणि सर्व शैक्षणिक माहिती भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी विहित आकारात अपलोड करा.
  4. ‘Online Application’ विभागात जाऊन संबंधित जाहिरातीसाठी अर्ज निवडा.
  5. केंद्राची निवड करा आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा.
  6. अर्जाची प्रत आणि फी पावती जतन करा.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

Some Useful Important Links

जाहिरात [PDF]Download Here
शुद्धीपत्रकClick Here
ऑनलाईन अर्जVisit Here
अधिकृत वेबसाइटClick Here
InstagramFollow Now
FacebookFollow Now
X (Twitter)Follow Now
WhatsApp ChannelJoin Now
Telegram ChannelJoin Now
YouTube ChannelSubscribe Now
MH Nokari Mobile AppDownload Now

MPSC गट-क भरती २०२६ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

शुद्धीपत्रकानुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून ५ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे.

या भरतीद्वारे एकूण किती पदे भरली जाणार आहेत?

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ५,७०७ रिक्त पदे भरली जातील.

MPSC गट-क पूर्व परीक्षा कधी होणार आहे?

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित आहे.

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत?

नवीन शुद्धीपत्रकानुसार तलाठी पदासाठी एकूण १,५३९ जागा उपलब्ध आहेत.

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!