MCGM Bharti 2026 – 145 जागांसाठी भरती | MCGM Recruitment 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MCGM Bharti 2026 – बृहन्मुंबई महानगरपालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये विविध 145 पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी 2026 आहे.


MCGM Bharti 2026 – Notification Overview

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयडॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू यांच्या आस्थापनेवर एकूण 145 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पदांसाठी निवड प्रक्रिया उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेले गुण आणि मुलाखतीमधील कामगिरी यांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. काही विशिष्ट पदांसाठी व्यवसाय चाचणी (Trade Test) अनिवार्य असेल.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रथम अर्ज शुल्क भरून पावती घेणे, त्यानंतर संपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह रुग्णालयाच्या आस्थापना विभागात प्रत्यक्ष सादर करणे अनिवार्य आहे.

या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.

हे पण वाचा : BMC Bharti 2026 : 10वी उत्तीर्णांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार पदासाठी भरती

Brihanmumbai Municipal Corporation (MCGM)

हन्मुंबई महानगरपालिका भरती 2026

Download Mh Nokari App Now

MCGM Bharti 2026 – महत्त्वाची माहिती

अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
नोकरी ठिकाणमुंबई
एकुण जागा145
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याची सुरुवात27 जानेवारी 2026
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख04 फेब्रुवारी 2026
अर्ज शुल्क
GEN/OBC/EWS934
SC/ST/PWD/ESM934

MCGM Bharti 2026 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
वैद्यकीय अधिकारी (महिला)
02
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
02
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
02
प्रयोगशाळा सहाय्यक
04
ई.सी.जी. तंत्रज्ञ
01
क्ष-किरण सहाय्यक
04
नोंदणी सहाय्यक
01
अर्धवेळ नोंदणी सहाय्यक
03
अंशकालीन अपवर्तनतज्ञ (Part time Refractionist)
01
व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालिक)
02
दूरध्वनी चालक ‘अ’ वेतनश्रेणी
01
प्रयोगशाळा परिचर
01
प्रयोगशाळा सेवक
07
वीजतंत्री III
01
तारतंत्री
02
तारतंत्री II
01
उदवाहनचालक
03
उदवाहनचालक नि तारतंत्री-III नि उदंचनचालक
01
तारतंत्री – III नि उदवाहनचालक नि उदंचनचालक
01
शितन मदतनीस
04
गवंडी II
01
सुतार
01
कक्ष परिचर
13
कक्ष नोकर
02
आया
25
सफाईगार
33
माळी नि सफाईगार
03
माळी
03
सफाईगार नि हलालखोर
01
हमाल नि कामगार
01
कामगार
02
ग्रंथालय परिचर
02
रुग्णवाहिका परिचर
05
शववाहिनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहिका परिचर
01
व्रणोपचारक
02
नाभिक
01
मदतनीस
01
शिंपी
01

MCGM Bharti 2026 साठी पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
  • MBBS
  • सहा महिन्यांचे House Post किंवा One year Residency Post अनुभव
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • B.Sc. पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा MSBT कडील D.M.L.T. पदविका
प्रयोगशाळा सहाय्यक
  • रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र किंवा बायोटेक्नॉलॉजी विषयांसह B.Sc. पदवी. विभागामार्फत घेतली जाणारी व्यावसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक
ई.सी.जी. तंत्रज्ञ
  • 12 वी नंतर 3 वर्षांचा B.P.M.T. (Cardio-Technology) पदवी अभ्यासक्रम. किंवा B.Sc. (Physics) सह ६ महिन्यांचा ई.सी.जी. कामाचा अनुभव. व्यावसाय चाचणी अनिवार्य
क्ष-किरण सहाय्यक
  • 12 वी नंतर 3 वर्षांचा B.P.M.T. (Radiography) पदवी अभ्यासक्रम आणि ६ महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण. व्यावसाय चाचणी अनिवार्य
नोंदणी सहाय्यक
  • HSC (12 वी) उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेचा (वाणिज्य, विज्ञान, कला, विधी) पदवीधर. संगणक प्रणाली (MS Office, Internet, E-mail) चे ज्ञान आवश्यक.
अर्धवेळ नोंदणी सहाय्यक
  • HSC (12 वी) उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेचा (वाणिज्य, विज्ञान, कला, विधी) पदवीधर. संगणक प्रणाली (MS Office, Internet, E-mail) चे ज्ञान आवश्यक.
अंशकालीन अपवर्तनतज्ञ (Part time Refractionist)
  • SSC सह ३ वर्षांची ऑप्टोमेट्री पदविका किंवा HSC सह B.Sc. (Optometry). पदवीधारकांना प्राधान्य.
व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालिक)
  • B.Sc. (OT) किंवा B.O.Th. पदवी; महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई येथे नोंदणीकृत असणे आवश्यक.
दूरध्वनी चालक ‘अ’ वेतनश्रेणी
  • SSC/HSC उत्तीर्ण आणि किमान ६ महिन्यांचा दूरध्वनी चालक अभ्यासक्रम पूर्ण. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
प्रयोगशाळा परिचर
  • SSC (१० वी) उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे, बोलणे)
प्रयोगशाळा सेवक
  • SSC (१० वी) उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे, बोलणे)
वीजतंत्री III
  • SSC (१० वी) उत्तीर्ण. PWD चा तारतंत्री परवाना किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI/NCTVT प्रमाणपत्र. व्यावसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक.
तारतंत्री
तारतंत्री II
उदवाहनचालक
उदवाहनचालक नि तारतंत्री-III नि उदंचनचालक
तारतंत्री – III नि उदवाहनचालक नि उदंचनचालक
शितन मदतनीस
  • SSC (१० वी) उत्तीर्ण. व्यावसाय चाचणी उत्तीर्ण होणे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
गवंडी II
सुतार
कक्ष परिचर
कक्ष नोकर
आया
सफाईगार
माळी नि सफाईगार
माळी
सफाईगार नि हलालखोर
हमाल नि कामगार
कामगार
ग्रंथालय परिचर
रुग्णवाहिका परिचर
शववाहिनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहिका परिचर
व्रणोपचारक
नाभिक
मदतनीस
शिंपी
  • SSC (१० वी) उत्तीर्ण. सरकारी संस्थेचे १ वर्षाचे tailoring & cutting प्रमाणपत्र किंवा २० आठवड्यांचा Advanced Tailoring Course. व्यावसाय चाचणी अनिवार्य

MCGM Bharti 2026 साठी वयोमर्यादा

01 जानेवारी 2026 रोजी

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

MCGM Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया

  • गुणवत्ता यादी

MCGM Bharti 2026 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्वप्रथम, रुग्णालयाच्या रोखपाल विभागात (खोली क्र. ६५, पहिला मजला, डी विंग) जाऊन ₹ 934/- अर्ज शुल्क भरा.
  2. शुल्क भरल्याची अधिकृत पावती घ्या.
  3. अर्ज (Application Form) पूर्णपणे आणि अचूक माहितीने भरा.
  4. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, आधार कार्ड इ.) स्व-साक्षांकित (self-attested) प्रती तयार करा.
  5. शुल्क भरलेल्या पावतीची छायांकित प्रत अर्जासोबत जोडा.
  6. पूर्ण भरलेला अर्ज सर्व कागदपत्रांसह आस्थापना विभाग, पहिला मजला, डी विंग, ह.बा.ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, जुहू येथे दिनांक 04/02/2026 रोजी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष सादर करा.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे लिंक

जाहिरात [PDF] 👉Download Here
मुलाखतीचे ठिकाणहि.बा.ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, रोखपाल विभाग. जुहू
अधिकृत वेबसाइट👉Click Here
Download Mh Nokari App Now👉Download Here
Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!