NHM CHO Bharti 2025 – 1974 पदांची मोठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), महाराष्ट्र  2025 या वर्षासाठी समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer – CHO) या पदाच्या एकूण 1974 जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, आरोग्य क्षेत्रात स्थिर करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे.


NHM CHO Bharti 2025 – राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई यांनी समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) या कंत्राटी पदाच्या एकूण 1974 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सुरुवातीला ही नियुक्ती ११ महिने आणि २२ दिवसांच्या कालावधीसाठी असेल, जी उमेदवाराची कामगिरी आणि प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार पुढे वाढवली जाऊ शकते. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये BAMS, BUMS, B.Sc. नर्सिंग, किंवा B.Sc. कम्युनिटी हेल्थ पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादेनुसार, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. निवड प्रक्रिया ही ऑनलाइन संगणक-आधारित परीक्षेच्या (CBT) माध्यमातून होईल आणि त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

हे पण वाचा : Bank of India Bharti 2025 – 115 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

National Health Mission (NHM)

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती 2025

NHM Maharashtra CHO Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
एकुण जागा1974

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू18 नोव्हेंबर 2025
अंतिम तारीख04 डिसेंबर 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

अर्ज शुल्क

GEN/OBC/EWS1000
SC/ST/PWD/ESM900

NHM CHO Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO1974

NHM CHO Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHOखालीलपैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे:

  • बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (BAMS)
  • बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS)
  • बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing)
  • बी.एस्सी. इन कम्युनिटी हेल्थ (B.Sc. in Community Health)

NHM CHO Bharti 2025 : 04 डिसेंबर 2025 रोजी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

NHM CHO Bharti 2025 : साठी निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन परीक्षा (Online Exam): सर्व पात्र उमेदवारांना १०० गुणांची संगणक-आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT) द्यावी लागेल.
  • गुणवत्ता यादी: परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना किमान ४५ गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र पडताळणी: गुणवत्ता यादीतील शीर्ष उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल.

NHM CHO Bharti 2025 : साठी अर्ज कसे करावे?

  1.  सर्वप्रथम राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://nhm.maharashtra.gov.in.
  2.  वेबसाइटच्या होमपेजवर “समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) भरती 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  4.  वेबसाइटवर नोंदणी (Registration) करून आपले प्रोफाइल तयार करा.
  5. आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून ऑनलाइन अर्ज पूर्ण करा.
  6. निर्देशांनुसार तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  7. आपल्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अर्ज सबमिट करा.
  8. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

 महत्त्वाची सूचना: अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा, कारण एकदा अर्ज सादर झाल्यावर त्यात बदल करता येणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

Some Useful Important Links

जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here
Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!