Bhor Crime : करंजगावात दिवसाढवळ्या चोरी! चोरट्यांनी घर फोडून १७ लाखांचा ऐवज केला लंपास

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
हिरडस मावळ – भोर तालुक्याच्या हिरडस मावळ खोऱ्यातील करंजगाव येथे बंद घराच्या दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत सुमारे १७ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन लंपास केला. ही घटना शुक्रवार (दि.१४) रोजी घडली असून याबाबत मारुती भैरु मळेकर (वय ६२, रा. करंजगाव ता. भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्या विरोधात गून्हा नोंद करण्यात आला आहे.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती भैरु मळेकर पत्नीसोबत नातूच्या पाचवीच्या कार्यक्रमा साठी महुडे येथे गेले होते.पाचवीचा कार्यक्रम करून परत आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सुमारे ३० हजार रोख रक्कम व २८ तोळे ६.५ ग्रॅम सोने असे एकूण १७ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळून आले.

सध्या ग्रामीण भागात भात कापणीची लगबग सुरु असून शेतकरी घरांना कुलूप लावून शेतात कामासाठी जात आहेत. परंतु चोरटे बंद घरे फोडू लागल्याने परीसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक दिप्ती करपे, ठाणे अंमलदार सुनील चव्हाण करीत आहेत.

The post Bhor Crime : करंजगावात दिवसाढवळ्या चोरी! चोरट्यांनी घर फोडून १७ लाखांचा ऐवज केला लंपास appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!