
मुंबई – पी एन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीने बुधवारी आपला दुसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित ढोबळ नफा दुपटीने वाढून 79 कोटी रुपये इतका झाला आहे.
या तिमाहीत कंपनीचा कर भरल्यानंतरचा निव्वळ नफा 34 कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती या कंपनीने शेअर बाजारांना उपलब्ध केली आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 8.80 टक्क्यांनी वाढून 2,177 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत हा महसूल 2,001 कोटी रुपये इतका होता.
कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले की, सर्वच क्षेत्रातील महसुलात वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात रिटेल क्षेत्र अधिक वेगाने वाढत आहे. मंगळसूत्र महोत्सव, पैंजण महोत्सव या आमच्या महोत्सवांना देशभरातील ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नवरात्रीत तब्बल 428 कोटी रुपयांची विक्री झाली. त्यामुळे आमचा ताळेबंद अधिक चमकदार होण्यास मदत झाली.
या तिमाहित कंपनीने दादरमध्ये आपले स्टोअर सुरू केले. त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर स्टोअर उघडण्याची मोहीम कंपनीने सुरू केली असून या तिमाहीत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशांमध्ये काही स्टोअर उघडण्यात आली. उत्सवाचा कालावधी संपुष्टात येत असतानाच लग्नाचा कालावधी सुरू होत आहे. त्यामुळे आगामी तिमाहीतही आमची विक्री वाढण्याची शक्यता आहे. या ताळेबंदानंतर कंपनीचा शेअर चा भाव 0.96 टक्क्यांनी वाढून 670 रुपये 60 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
The post पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा ताळेबंद झळकला! नवरात्रीत 428 कोटींची विक्री, नफा दुपटीने वाढला appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











