
नवी दिल्ली – उत्सवाच्या 42 दिवसाच्या काळात देशात किरकोळ वाहन विक्री म्हणजे वितरकांनी ग्राहकांना विकलेल्या वाहनांची विक्री विक्रमी झाली आहे. या कालावधीत झालेली वाहन विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 21 टक्क्यांनी वाढून 52 लाख युनिट इतकी झाली असल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने सांगितले आहे.
उत्सवाच्या कालावधीत जीएसटी परिषदेने विविध वाहनावरील जीएसटीत मोठी कपात जाहीर केली. त्यामुळे आतापर्यंत तुंबलेली विक्री उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. या कालावधीत एकूण विक्री म्हणजे दुचाकी आणि इतर वाहनांची विक्री तब्बल 52.38 लाख युनिट इतकी झाली. गेल्या वर्षी या कालावधीत एकूण वाहन विक्री 43.25 लाख युनिट झाली होती.
या संघटनेचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी सांगितले की, 22 सप्टेंबरपूर्वी एक महिना अगोदर जीएसटीत कपात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या कालावधीत वाहन विक्री झाली नव्हती. मात्र कंपन्या आणि वाहन वितरकांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची व्यवस्था या कालावधीत केली व आमचा आशावाद यशस्वी ठरला. दसर्यात आणि दिवाळीत विक्रमी दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्री झाली.
या कालावधीत प्रवासी वाहन विक्री 23 टक्क्यांनी वाढून 7.66 लाख युनिट इतकी झाली. गेल्या वर्षी या कालावधीत 6.21 लाख वाहनांची विक्री झाली होती. छोटया कारच्या विक्रीवर गेल्या अनेक महिन्यापासून नकारात्मक परिणाम होत होता. या कारवारील जीएसटी कमी झाल्यानंतर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या कालावधीत साठा मर्यादित असल्याचे जाणवले.
त्यातील बरेच ग्राहक सध्या वेटिंग लिस्टवर आहेत. या ग्राहकांना संबंधित वाहन पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ऑक्टोबर महिन्यासाठीची आकडेवारी तर त्यापेक्षा समाधानकारक असून ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली वाहन विक्री तब्बल 41 टक्क्यांनी वाढून 40.23 लाख युनिट झाली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांनांही ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
40 लाख दुचाकींची विक्री
उत्सवाच्या केवळ 42 दिवसाच्या कालावधीत देशभरात तब्बल 40.42 लाख दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी या कालावधीत विकल्या गेलेल्या 33.27 लाख दुचाकीपेक्षा हे प्रमाण 22 टक्क्यांनी जास्त आहे या कालावधीत बँका आणि वित्तीय संस्थांनी ग्राहकांना वाहन खरेदी करण्यासाठी आवश्यक वित्तीय उत्पादने उपलब्ध केल्यामुळे एकूणच वाहन विक्री वाढण्यास मदत झाली. या कालावधीत तीन चाकी वाहनांची विक्री 9 टक्क्यांनी तर व्यावसायिक वाहनांची विक्री 15 टक्क्यांनी वाढली.
The post फेस्टिव सीजनमध्ये विक्रीचा धमाका! फक्त 42 दिवसांत 52 लाख वाहनं विकली appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











