
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी अक्कलकुवा मार्गावरील देवगोई घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अपघातानंतर स्थानिकांसह प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेच्या स्कूल बसला अपघात झाला. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे मेहुनबारे आश्रम शाळेच्या दोन बस आज विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. त्यातील एक बस अक्कलकुवा-मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातग्रस्त स्कूल बसमध्ये अंदाजे 30 ते 35 विद्यार्थी होते.
अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. स्कूल बस खोल दरीत कोसळल्यामुळे बसचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर अक्कलकुवा, धडगाव, कुळगाव या ठिकाणच्या रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
तसेच या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची समोर येत आहे. त्यामुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
The post मोठी दुर्घटना..! स्कूल बस दरीत कोसळली; 35 विद्यार्थी करत होते प्रवास appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











