
Nashik Mahanagarpalika Bharti 2025
नाशिक महापालिकेत विविध पदांच्या तीन हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त असताना सरळसेवा भरतीतून केवळ ३०० जागा भरल्या जाणार आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यामुळे नाशिक महापालिकेला वाढीव मनुष्यबळाची गरज लागणार असल्याने सरकारने महापालिकांमध्ये मनुष्यबळ भरती करण्याच्या निकषामध्ये काही सवलत दिली आहे. नाशिक महापालिकेला स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक व कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागात चालक आणि फायरमन मिळून ३०० रिक्त जागा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे महापालिकेने सहायक व कनिष्ठ अभियंता पदासाठी ११४ जागा व चालक, फायरमन यांच्या १८६ जागा, अशा ३०० जागांच्या भरतीची जाहिरात दिली आहे. नाशिक महापालिकेत तीन हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त असताना या सरळसेवा भरतीतून अवघ्या ३०० जागा भरल्या जाणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये रस्ते, पूल, बांधकाम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नदी स्वच्छता आदी विभागांची कामे मोठ्याप्रमाणावर होणार आहे. यामुळे महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.
तसेच कुंभमेळा काळात आपत्ती व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा असल्याने सरकारने महापालिकेला स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक व कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागात चालक आणि फायरमन यांची सरळसेवा पद्धतीने भरती करण्यास परवानगी दिली आहे. महानगरपालिका आस्थापनेवर ७०८२ जागा मंजूर आहेत. यातील तीन हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. मात्र, या जागा भरल्यास महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक होईल, यामुळे नगरविकास विभागाकडून नाशिक महापालिकेला कर्मचारी भरती करण्यास परवानगी दिली जात नव्हती. महापालिकेकडून २०२२ पासून भरती प्रक्रियेची तयारी सुरू होती. सुरुवातीला आरोग्य व अग्निशमन विभागाचे मिळून ७०६ पदांची भरती करण्याचा निर्णय २०२२मध्ये महापालिकेने घेतला होता. त्यासाठी परीक्षा घेणाऱ्या संस्थेची निवड प्रक्रियाही पूर्ण केली होती. मात्र, सरकारकडून भरती राबवण्यास परवानगी न मिळाल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले.
त्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तांत्रिक मनुष्यबळाची निकड लक्षात घेऊन शासनाने गेल्या फेब्रुवारीत सरळसेवेने विविध विभागातील १४० अभियंत्यांची पदे भरण्यास मान्यता दिली होती. तसेच या भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथील करण्यात आली.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025
Nashik Mahanagarpalika Bharti 2025: Nashik Mahanagarpalika has published the notification for the Post of “Assistant Engineer, Junior Engineer, Assistant Junior Engineer”. There are 114 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for application is 01st of December 2025. For more details about Nashik Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता” पदाची एकूण 114 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता
- पदसंख्या – 114 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.nmc.gov.in/
Nashik Mahanagarpalika Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| सहाय्यक अभियंता | 01 |
| कनिष्ठ अभियंता | 12 |
| सहाय्यक कनिष्ठ अभियंता | 60 |
Salary Details For Nashik Mahanagarpalika Job 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| सहाय्यक अभियंता | S-15 Rs. 41800/- to Rs. 132300/- |
| कनिष्ठ अभियंता | S-14 Rs. 38600/- to Rs. 122800/- |
| सहाय्यक कनिष्ठ अभियंता | S-10 Rs. 29200/- to Rs. 92300/- |
How To Apply For Nashik Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२५ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित लिंक वर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nmc.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/ApZMQ |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ycbft |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.nmc.gov.in/ |
The post नाशिक महापालिकेच्या रिक्त जागा 3 हजार मग भरती केवळ 300 जागांसाठीच का?!! – Nashik Mahanagarpalika Bharti 2025 appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











