
मुंबई – अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँक भारतातील काही बँका जागतिक पातळीवरील बँका बनविण्याबाबत काही वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत 2030 पर्यंत भारतातील किमान तीन बँका जागतिक पातळीवरच्या होण्याची तयारी सुरू असल्याचे मत स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी व्यक्त केले.
बाजार मूल्याच्या आधारावर ज्या तीन बँका 2030 मध्ये जागतिक पातळीच्या होतील त्यामध्ये भारताची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचा समावेश असेल. त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील दोन बँका यामध्ये समाविष्ट असतील असे त्यांनी सुचित केले. पत्रकाराशी बोलताना शेट्टी म्हणाले की, सध्या भारतीय स्टेट बँकेचे बाजार मूल्य तब्बल 100 अब्ज डॉलर आहे. खासगी क्षेत्रातील दोन बँकांचे बाजार मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
स्टेट बँकेने या अगोदरच आपला व्याप मोठ्या प्रमाणात वाढविला आहे आणि 2030 मध्ये जगातील पहिल्या दहाव्या बँकांमध्ये समाविष्ट होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून त्याचा आढावा वेळोवेळी घेतला जात आहे.
मात्र खासगी क्षेत्रातील इतर दोन कोणत्या बँका असतील याची नाव शेट्टी यांनी घेतले नाही. भारतीय स्टेट बँकेने नुकतेच 25 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. ही रक्कम फार मोठी नाही. मात्र उद्योगांना बँकेबद्दल खात्री वाटावी यासाठी ही भांडवल उभारणी करण्यात आली आहे. स्टेट बँकेला भांडवल उभारण्यात कधीच अडचणी आल्या नाहीत असे त्यांनी सांगितले.
स्टेट बँक जगात 43 व्या क्रमांकावर
प्राप्त माहितीनुसार स्टेट बँकेचे बाजार मूल्य 100 अब्ज डॉलर म्हणजे 8.82 लाख कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 15.11 लाख कोटी रुपये आहे तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 9.59 लाख कोटी रुपये इतके आहे. उलाढालीनुसार सध्या स्टेट बँक ही जगातील 43 व्या क्रमांकाची बँक आहे. पहिल्या दहा मध्ये येण्यासाठी पुढील पाच वर्ष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
The post 2030 पर्यंत भारतातील तीन बँका जागतिक पातळीवर! एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांचा मोठा दावा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











