
नवी दिल्ली – भारताने आपली निर्यात मर्यादीत देशाऐवजी जास्तीत जास्त देशांना करण्याचे ठरविले आहे. अशा परिस्थितीत विविध देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. अशातच रशियाला होणारी अभियांत्रिक वस्तूची निर्यात वाढविण्यासाठी पुढील आठवड्यात भारतीय निर्वातदारांचे शिष्टमंडळ रशियाला भेट देणार आहे.
पुढील आठवड्यामध्ये मास्को येथे चार दिवसाचे अभियांत्रिकी विषयावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाला भारतीय सिष्टमंडळ भेट देणार असल्याचे भारतीय निर्यातदारांच्या संघटनेचे अध्यक्ष एस सी रल्हन यांनी सांगितले. भारतातील कोणत्या वस्तू रशियन आयादारांना उपयुक्त ठरू शकतील अशा वस्तूचे प्रदर्शन भारतीय निर्यातदार या प्रदर्शनात मांडणार आहेत. भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील 20 कंपन्या आपली उत्पादने रशियात उपलब्ध करणार आहेत. त्यामध्ये हँड टूल्स, अभियांत्रिकी वस्तू, औद्योगिक हार्डवेअर, यंत्रसामग्रीचे सुटे भाग इत्यादीचा समावेश आहे.
इतर वस्तूंबरोबरच भारतातील अभियांत्रिकी वस्तूंना रशियामध्ये चांगलीच मागणी आहे. या क्षेत्रातून रशियाला यावर्षी 1.75 अब्ज डॉलर म्हणजे जवळजवळ 15,000 कोटी रुपयांची निर्यात होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियाने धोरणात्मक पातळीवर निर्यात वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अमेरिकेने भारतावर ऑगस्ट महिन्यात एकतर्फी 50 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर भारताने विविध देशांना निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे . भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याचे निमित्त करून अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त निर्यात शुल्क लावले आहे. त्याच रशियाबरोबर भारताला निर्यात वाढविण्याची संधी आहे. या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि भारतीय निर्यातदार घेत असल्याचे समजले जाते.
रशियाबरोबरच तत्कालीन सोव्हियत युनियनमधील इतर अनेक देशांबरोबर भारत निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर चीनबरोबर व्यापारी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न जारी आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांबरोबर मुक्त व्यापार करार झाले आहेत. मध्यपूर्व देश, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील देशांबरोबरही मुक्त व्यापार करार करण्यासाठी उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल मोहीम पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
The post भारताची मोठी चाल! अमेरिकेच्या शुल्काला उत्तर देत रशियात ‘इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट मिशन’, 15,000 कोटींच्या निर्यातीचा नवा मार्ग खुला! appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











