भारताला धक्का! नेपाळनेही चलनी नोटा छपाईचं कंत्राट चीनला दिलं, ₹142 कोटींचा मोठा सौदा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि बांगलादेशनंतर आता नेपाळनेही आपल्या चलनी नोटा छापण्याचे कंत्राट चीनला दिले आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने (NRB) 1000 रुपयांच्या 43 कोटी नवीन नोटा छापण्याचे काम चीनच्या सरकारी कंपनी ‘चायना बँकनोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन’ (CBPM) ला दिले आहे. या कंत्राटाची किंमत सुमारे ₹142 कोटी (16.98 दशलक्ष डॉलर) आहे.

नेपाळकडे स्वतःची प्रगत नोट छपाईची यंत्रणा नसल्यामुळे, ते जागतिक निविदांद्वारे परदेशी कंपन्यांकडून नोटा छापून घेते. ऐतिहासिकदृष्ट्या ब्रिटन आणि भारताच्या कंपन्या हे काम करत होत्या, पण 2015 पासून चीनची CBPM कंपनी नेपाळच्या ₹5, ₹10, ₹100, ₹500 आणि आता ₹1000 च्या नोटा छापत आहे. सर्वात कमी किमतीची बोली लावल्याने त्यांची निवड झाली आहे.

भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या काळात नेपाळने घेतलेल्या या निर्णयामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. पारंपारिकपणे भारत अनेक संवेदनशील कामांमध्ये नेपाळचा भागीदार राहिला आहे. मात्र, नेपाळचा चीनकडे वाढणारा आर्थिक आणि सामरिक कल यातून स्पष्ट दिसतो.

पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, थायलंडसह 9 देशांच्या नोटा छापणारी CBPM कंपनी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (BRI) अंतर्गत कमी किमतीत आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह नोटा छापून देत आहे. नेपाळचा हा निर्णय भारत आणि चीन यांच्यातील प्रादेशिक आणि आर्थिक वर्चस्वाच्या लढाईत एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

The post भारताला धक्का! नेपाळनेही चलनी नोटा छपाईचं कंत्राट चीनला दिलं, ₹142 कोटींचा मोठा सौदा appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!