
Rashi Khanna : अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेला १२० बहादूर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते. यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता अजिंक्य देव विशेष भूमिकेत दिसणार आहे.
रजनीश घई दिग्दर्शित या चित्रपटात फरहान अख्तर एका सैनिकाची भूमिका साकारत आहे. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अभिनेत्री राशी खन्ना ही देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्रीने तिच्या व्यक्तिरेखेचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. त्यासोबतच तिने पोस्टही लिहिली आहे.
राशी तिच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना राशी खन्नाने, “मी युद्धभूमीवर गेली नाही, पण ती दररोज युद्ध जगली. सुगन शैतान सिंग भाटीला भेटा. असे चित्रपट पाहण्याचे आवाहन तिने पोस्टमध्ये केले आहे.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, हा चित्रपट अशा महिलांसाठी आहे ज्या मनापासून प्रेम करतात. ज्या त्यांच्या घरात देशाच्या सैनिकांची काळजी घेतात. या महिला अभिमान आणि वेदना एकत्र ठेवतात. राशी खन्ना चित्रपटातील मुख्य पात्र शैतान सिंग भाटी (फरहान अख्तर) च्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
‘१२० बहादूर’ चित्रपटाची कथा १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान झालेल्या रेझांगला येथील लढाईवर आधारित आहे. या युद्धात मेजर शैतान सिंग भाटी यांच्या नेतृत्वाखाली १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या सुमारे १२० भारतीय सैनिकांनी ३,००० हून अधिक चिनी सैनिकांचा धैर्याने सामना केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढाई केली. २१ नोव्हेंबर या दिवशी हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : “सीनचा डेमो दाखविताना…”; संघर्षाच्या काळात घडली धक्कादायक घटना; मौनी रॅायने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
The post “मी युद्धभूमीवर गेली नाही, पण…” ; अभिनेत्री राशी खन्नाची पोस्ट चर्चेत, 120 बहादूर चित्रपटातील लूक केला शेअर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











