
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला येथील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ आज सायंकाळी ६:५५ च्या सुमारास उभ्या असलेल्या एका इको व्हॅनमध्ये झालेल्या हाय इंटेंसिटी स्फोटामुळे (High Intensity Blast) प्रचंड हाहाकार माजला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले?
हा भीषण स्फोट लाल किल्ल्याजवळच्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की, व्हॅनचे अक्षरशः तुकडे झाले आणि बाजूला उभ्या असलेल्या ५ ते ६ गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.
स्फोटानंतर व्हॅनने लगेचच पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
जखमींना तातडीने जवळच्या लोक नारायण जयप्रकाश (LNJP) रुग्णालय आणि इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेहही एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, NIA करणार तपास –
हा स्फोट कशामुळे झाला, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. हा अपघात होता की, यामागे कोणताही घातपात आहे, याचा तपास आता केंद्रीय यंत्रणा करणार आहेत.
स्फोटाच्या गंभीरतेमुळे, राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहे. दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि टेक्निकल एक्स्पर्ट्सचे पथकही तपास करत आहे.
घटनेनंतर लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील भागात झालेल्या या स्फोटामुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
The post दिल्ली हादरली: लाल किल्ल्याजवळ इको व्हॅनचा भीषण स्फोट; 10 ठार, 24 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











