पुणे-अबुधाबी थेट विमान सेवा! एअर इंडियाची पुणे-अबुधाबी विमानसेवा लवकरच सुरू, वेळापत्रकही जाहीर

Airoplane
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – एअर इंडियाने पुण्यातून अबुधाबीसाठी नव्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागपूरवरून बेंगळुरूला विमान सेवा सुरू होणार आहे.अबुधाबी विमानसेवेमुळे दुबई (शारजाह), सिंगापूर, बँकॉकनंतर ही चौथी आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुण्यातून सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय पर्यटन, प्रवासासाठी आणखी एक डेस्टीनेशन मिळणार आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ पासून ही नवीन सेवा सुरू होणार आहे.

दर आठवड्याला तीन विमान उड्डाणे अबुधाबीसाठी होतील. तितकीच विमाने अबुधाबीहून पुण्यासाठी होतील. दर आठवड्यात गुरूवार, शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी विमान अबुधाबीसाठी उड्डाण करेल. त्यानंतर ते रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी अबुधाबी येथे उतरेल. तसेच दर आठवड्याला गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी अबुधाबीहून पुण्यासाठी उड्डाण करेल. त्यानंतर ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी पुण्यात उतरेल.

The post पुणे-अबुधाबी थेट विमान सेवा! एअर इंडियाची पुणे-अबुधाबी विमानसेवा लवकरच सुरू, वेळापत्रकही जाहीर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!