
उदापूर – अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर अहिनवेवाडी फाटा येथील माऊली कृषी केंद्राजवळ आज सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून खताची गोण घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप घातल्याची घटना घटना घडली.
निलेश सीताराम डोके (रा. आंबेगव्हाण, ता. जुन्नर) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडक दिल्यानंतर बिबट्या तिथून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओतूर-जुन्नर परिसरात बिबट्यांचे प्रमाण वाढले असून, वनविभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
The post नगर-कल्याण महामार्गावर बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











