
प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीतर्फे संयुक्तपणे निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा भाजपचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.सोमवारी (दि. १०) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे माजी शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
दोन्ही उमेदवारांना अडीच-अडीच वर्षे नगराध्यक्ष पदाची समान संधी देण्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबनराव भेगडे, गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, शैलजा काळोखे, सत्यशीलराजे दाभाडे, सुहास गरुड, रामभाऊ गवारे, अशोक दाभाडे, बाबुलाल नालबंद, शिवाजी आगळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील, गणेश काकडे, भाजपाचे शहराध्यक्ष चिराग खांडगे, माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्याशिवाय दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती बळकट झाली आहे. तळेगावच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर आमदार सुनील शेळके यांनी शहरातील प्रलंबित विकासकामे गतीमान करण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही महायुतीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले, तर आभार तळेगाव शहर भाजप अध्यक्ष चिराग खांडगे यांनी मानले.
नगराध्यक्ष पदासाठी समझोता
भाजपचे संतोष दाभाडे पाटील पहिले अडीच वर्षे, तर राष्ट्रवादीचे गणेश काकडे पुढील अडीच वर्षे नगराध्यक्ष पद वाटून देण्यात आले आहे. २८ नगरसेवकांच्या जागांचे वाटप महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करून करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
लोणावळा व वडगावमध्येही महायुतीचा फॉर्म्युला
मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपालिका आणि वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीतही महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे भेगडे आणि शेळके यांनी स्पष्ट केले.
The post तळेगाव दाभाडेत महायुतीचा फॉर्म्युला! भाजप-राष्ट्रवादी एकत्र, नगराध्यक्षपदाची समान वाटणी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











