अमृततर्फे युवकांना मिळणार मोफत ड्रोन-पायलट प्रशिक्षण

mahaamrut logo

AMRUT Training Update

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) तर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून उमेदवारांना नागरिक उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार असून, कृषी, सर्वेक्षण, छायाचित्रण, चित्रफितनिर्मिती, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शेतीमध्ये फवारणी व तपासणी अशा विविध क्षेत्रांत रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या दिशा खुल्या होतील.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रशिक्षणामध्ये मध्यम वर्ग ड्रोन प्रशिक्षण, लघु वर्ग ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षक प्रशिक्षण, कृषी क्षेत्रातील ड्रोन वापर, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनातील ड्रोन वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल आणि सेवा प्रशिक्षण तसेच छायाचित्रण व चलचित्र निर्मिती प्रशिक्षण अशा एकूण आठ प्रकारचे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. प्रत्येक तुकडीत १५ विद्यार्थ्यांचा समावेश असेल. हे प्रशिक्षण रायगड पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि परभणी या केंद्रांवर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्राथमिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील अशा समाजांना दिला जाणारआहे, ज्यांना कोणत्याही शासकीय महामंडळ किंवा संस्थेकडून समकक्ष योजना मिळत नाही. यामध्ये ब्राह्मण, मारवाडी, माहेश्वरी, गुजराती, सिंधी, राजपूत, कोमटी, पटेल, बंगाली, ठाकूर, पाटीदार आदी समाजांचा समावेश आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावेत, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असावी.

अर्जदारांनी ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, फिटनेस दाखला तसेच शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (शाळा सोडल्याचे दाखला किंवा प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. अर्जाची छापील प्रत सर्व कागदपत्रांसह स्वाक्षरीसह अमृतसंस्थेच्या अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, बीड येथील जिल्हा कार्यालयात सादर करावी.

तसेच या संदर्भात अमृत संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मो. : ९११२२२८७५९ उपव्यवस्थापक मंगेश भागुराम ढेबे मो. ८१४९५५२१४३ तसेच अमृतमित्र अश्विन अभय वाड, मो. : ९०११५४३६४५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


 

AMRUT Logo & Tagline Composition Competition

AMRUT Logo & Tagline Composition Competition : Under the auspices of Maharashtra Research, Upliftment and Training Academy (AMRUT), logo and slogan design competition has been organized for AMRUT. All residents of India and all registered public / private entities in Maharashtra will be eligible for this competition. Communication is to be reported online via e-mail. The deadline to submit applications is January 15, 2022. Further details are as follows:-

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतातील सर्व रहिवासी आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक/ खासगी संस्था या स्पर्धेकरिता पात्र असतील. सहभाव ऑनलाईन इ-मेल पद्धतीने नोंदवायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • स्पर्धेचे नाव – AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य रचना स्पर्धा
  • पात्रता – भारतातील सर्व रहिवासी आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक/ खासगी संस्था
  • इ-मेल पत्ता – amrutacademy.gom@gmail.com
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022
  • किवर्ड – महाराष्ट्र संशोधन, प्रशिक्षण, उन्नती, नवकल्पना, कौशल्ये
  • वयोमर्यादा – 12 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील
  • बक्षीस – रक्कम रु. 1,00,101

AMRUT Logo & Tagline Composition Competition

Background for LOGO Design Consideration:

Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (AMRUT) came into existence on 1st October, 2021 to ensure educational and financial growth of the economically weaker sections (EWS) from the general category.

AMRUT will help the open category youth attain growth in areas such as industry and business through pursuit of higher education and targeted industry specific skill development, innovation, including startup.

Logo & Rationale:

The logo should be reflective of the key characteristics & objectives of AMRUT.

Rationale: A maximum of 100 words in English/Marathi to describe the concept, theme and symbolic elements.

Terms and Conditions 

1. Last date for submission of entries is 15th January, 2022.

2. Each participant can submit single entry only. If any participant/s will submit multiple entries, the last entry submitted by that participant/s will be considered.

Eligibility:

  • Only Indian Nationals are eligible for this Competition.
  • Age Limit: 12 years and above.
  • Individual person, Individual group of peoples, groups, experts, professionals, private organizations etc. are eligible.
  • Any competitor can submit maximum one entry. The prize will be given to the author of the competition entry in case of group.

या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – https://bit.ly/3EpNLUJ

 

The post अमृततर्फे युवकांना मिळणार मोफत ड्रोन-पायलट प्रशिक्षण appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!