BMC Bharti 2024 – 1846 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

 

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 – 1846 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. BMC ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, कार्यकारी सहाय्यक (लिपिक) रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत  अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 25 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

 

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण जागा1846 जागा
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज सुरू होण्याची तारीख25 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख09 सप्टेंबर 2024
जाहिरात क्रMPR/7814

 

 

BMC recuirement 2024 साठी रिक्त जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 1846 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

 

पदाचे नावपद संख्या
कार्यकारी सहायक (लिपिक)1846

BMC Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक (लिपिक)
  • 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी
  • इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • MS-CIT किंवा समतुल्य

BMC Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

BMC Bharti 2024 साठी वयोमर्यादा

14 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

 

BMC Bharti 2024 साठी अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.1000 आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.900 अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.

  • GEN/OBC/EWS :-  1000
  • SC/ST/PWD/ESM :- 9000

 

BMC Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा

25  ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावा.
  • अर्ज सुरू: 25 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 सप्टेंबर 2024

BMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?

  1. सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 9 सप्टेंबर 2024
  5. 👉 ऑनलाईन अर्ज करा
  6. 👉 जाहिरात pdf डाउनलोड करा
  7. 👉अधिकृत वेबसाइट